-
भारतीय नागरिकांचे अत्यंत महत्त्वाचे ओळखपत्र म्हणजे ‘आधार कार्ड.’ अनेक गोष्टींसाठी ओळखपत्र म्हणून आधार कार्डचा उपयोग करण्यात येतो. (फोटो सौजन्य : @Freepik )
-
=तर तुम्हाला महिती आहे का की, ब्ल्यू (निळ्या रंगाचे) आधार कार्ड सुद्धा असते. हे ब्ल्यू (निळ्या रंगाचे) आधार कार्ड म्हणजे बाल आधार कार्ड. (फोटो सौजन्य : @लोकसत्ता ग्राफिक्स टीम )
-
तुम्हालादेखील तुमच्या मुलाचे ब्ल्यू आधार कार्ड काढायचे असेल तर अर्जाची प्रक्रिया याबद्दल आपण अधिक जाणून घेऊ. (फोटो सौजन्य : @Freepik )
-
ब्ल्यू आधार कार्ड पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी असते. हे आधार कार्ड लहान मुलं पाच वर्षांची होईपर्यंत वैध असते. (फोटो सौजन्य : @Freepik )
-
जन्म प्रमाणपत्र किंवा हॉस्पिटलच्या डिस्चार्ज स्लिपचा वापर करून पालक नवजात बाळाच्या ब्ल्यू आधार कार्डसाठी अर्ज करू शकतात. तसेच पालक शाळकरी विद्यार्थ्यांचे ब्ल्यू आधार कार्ड काढण्यासाठी मुलांच्या शाळेचा आयडीदेखील वापरू शकतात. (फोटो सौजन्य : @Freepik )
-
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) या वेबसाईटवर जा. तिथे आधार कार्ड नोंदणीसाठी (रजिस्ट्रेशन) असा पर्याय असेल, तो निवडा. येथे तुमच्या मुलाचे/मुलीचे नाव, पालकांचा फोन नंबर आणि नोंदणीसाठी (रजिस्ट्रेशन) अपॉइंटमेंट स्लॉट निवडा. (फोटो सौजन्य : @Freepik )
-
नोंदणी (रजिस्ट्रेशन) करण्यासाठी तुमच्या जवळचे आधार नाव नोंदणी केंद्र बुक करा. (फोटो सौजन्य : @Freepik )
-
तसेच पालकांनी स्वतःचे आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा आणि मुलाचे जन्म प्रमाणपत्र आदी कागदपत्रांसह नोंदणी केंद्राला भेट द्यावी. (फोटो सौजन्य : @Freepik )
-
त्यानंतर कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया सुरू होईल.कागदपत्र पडताळणीनंतर ६० दिवसांच्या आत तुमच्या मुलाच्या नावावर ब्ल्यू आधार कार्ड जारी केले जाईल. (फोटो सौजन्य : @Freepik )
आता ऑफिसमध्ये पाणी पिण्याची पण भीती! पाहा Viral Video तील किळसवाणी घटना