-
Water Shortage: पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या जगातील काही प्रमुख शहरांचे अहवाल सध्या समोर येत आहेत. विशेष म्हणजे या ८ शहरांच्या यादीमध्ये भारतीय शहराचे नाव सर्वात वरच्या स्थानी आहे. एरवी शुष्क प्रदेश म्हणून ओळखला जाणारे राज्य राजस्थान किंवा त्यालगतच्या पट्ट्यातील हे शहर नसून दक्षिण भारतातील सर्वात प्रगत शहरांपैकी एक असे आहे. टीओआयच्या अहवालात समाविष्ट पाणी टंचाईने त्रस्त अशा या शहरांचा व तेथील मूळ समस्यांचा एक आढावा घेऊया..
-
बंगळुरूमध्ये अर्ध्याहून अधिक पिण्याचे पाणी सांडपाण्यात वाहून जाते, तर शहरातील ८५% तलाव केवळ सिंचन किंवा औद्योगिक वापरासाठी योग्य आहेत. जुनाट पायाभूत सुविधा, पावसाचे पाणी प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यास असमर्थता आणि पाणीपुरवठ्यासाठीची मर्यादित कनेक्टिव्हिटी यामुळे बंगळुरूमध्ये अनेक ठिकाणी पाणी टंचाई आढळून येते. रहिवासी अनेकदा पाणी पुरवठा करणाऱ्या खासगी कंपन्यांकडून अधिक दरात पाणी खरेदी करतात. राष्ट्रीय अहवालात असे दिसून आले आहे की शहराचे अर्ध्याहून अधिक पिण्याचे पाणी हे केवळ वाया जात आहे.
-
दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन या शहरात २०१७-१८ मध्ये पाणी टंचाईची समस्या शिगेला पोहोचली होती. या दोन वर्षात पाणी पुवठा करणारी धरणे साधारण १४ टक्क्यांपेक्षा कमी भरली होती. सध्या हे पातळी ५० टक्क्यावर पोहचली असली तरी लोकसंख्या पाहता हे प्रमाण अपुरेच आहे. शहरात दैनंदिन प्रत्येक घरामागे १३ गॅलन पाणी पुरवठा होत असल्याचे समजते.
-
एकेकाळी जगातील महान संस्कृतींच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या नाईल नदीला सध्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. इजिप्तच्या ९७% पाण्याचे उगमस्थान असणारी ही नदी सध्या प्रक्रिया न केलेल्या कृषी आणि निवासी कचऱ्यामुळे दूषित होत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या आकडेवारीनुसार, जलप्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत कमी-मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये इजिप्तचा समावेश आहे. २०२५ पर्यंत देशात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता संयुक्त राष्ट्रांनी वर्तवली आहे.
-
अनेक किनारी शहरांप्रमाणेच, जकार्ता समुद्राच्या पाण्याची पातळी वाढण्याच्या धोक्याचा सामना करत आहे. वर्ल्ड बँकेच्या म्हणण्यानुसार, जकार्ताचा अंदाजे ४०% भाग आता समुद्रसपाटीच्या खाली असल्याचा अंदाज आहे. दुसरीकडे जकार्तामधील परिस्थिती मानवी हस्तक्षेपामुळे सुद्धा बिघडलेली आहे. १० दशलक्ष रहिवाशांपैकी निम्म्याहून कमी रहिवाशांना पाईपद्वारे पाण्याची उपलब्धता आहे, त्यामुळे इतरत्र बेकायदेशीर विहीर खोदणे सर्रासपणे सुरू आहे, ज्यामुळे भूगर्भातील जलचरांचा ऱ्हास होत आहे
-
मेलबर्नमधील मोठ्या प्रमाणात होणारी जंगलतोड ही गंभीर समस्या ठरत आहे. मेलबर्नसाठी केंद्रीत पुरवठा प्रामुख्याने स्थानिक जंगलांच्या पाणलोटांमध्ये स्थित आहे. परिणामी, जंगलतोड शहरासाठी एक महत्त्वाचा धोका आहे, व यामुळे शहरांमध्ये पाणीपुरवठ्यात अडथळे निर्माण होत आहेत
-
तुर्की सरकारच्या अधिकृत आकडेवारीच्या आधारे, देश सध्या पाण्याच्या टंचाईचा सामना करत आहे, २०१६ मध्ये दरडोई पुरवठा १,७०० क्यूबिक मीटरच्या खाली गेला होता. ही परिस्थिती 2030 पर्यंत आणखी गंभीर होऊ शकते. १४ दशलक्ष रहिवासी असलेल्या इस्तंबूल सारख्या दाट लोकवस्तीच्या प्रदेशात यापूर्वी २०१४ च्या सुरूवातीस, शहरातील जलाशयांची पातळी त्यांच्या क्षमतेच्या ३० टक्क्यांपेक्षा कमी झाली होती
-
मेक्सिकन राजधानीला सततच्या पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागतो. २१ दशलक्ष लोकसंख्येतील सुमारे २०% लोकांना आठवड्यातून फक्त काही तास नळाचे पाणी मिळते. ४०% पाणी आयात करूनही, शहरामध्ये सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी व्यापक प्रमाणात व्यवस्थापनाचा अभाव आहे. शिवाय, पाईप नेटवर्कमधील समस्यांमुळे अंदाजे ४०% पाणी वाया जाते
-
श्रीमंत शहरांपैकी एक अशा लंडनचा सुद्धा या यादीत समावेश आहे. सुमारे ६०० मिमी सरासरी वार्षिक पाऊस असूनही, लंडन त्याच्या ८०% पाणीपुरवठ्यासाठी नद्यांवर, प्रामुख्याने थेम्स आणि लेआवर अवलंबून आहे. ग्रेटर लंडन प्राधिकरणाच्या माहितीनुसार, २०२५ पर्यंत पाणी पुरवठ्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे, तर २०४० पर्यंत ‘पाणी टंचाई’ हा मुद्दा गंभीर होण्याची शक्यता आहे. (सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…