-
ग्लोबल फेम गायिका रिहाना भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनसाठी भारतात दाखल झाली आहे. (photo – Instagram)
-
या कार्यक्रमात दमदार परफॉर्मन्स देण्यासाठी रिहाना गुरुवारी गुजरातच्या जामनगरला पोहोचली. पॉप क्वीनच्या आगमनापूर्वी तिच्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. (photo – AP)
-
जंगल थीम असलेल्या कारपासून ते कार्यक्रमस्थळी मोठे कंटेनर घेऊन जाण्यापर्यंत, रिहाना आणि तिच्या टीमच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेण्यात आली. (photo – AP)
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिहानाने अंबानी कुटुंबाच्या या सेलिब्रेशनचा एक भाग होण्यासाठी करोडोंमध्ये फी आकारली आहे. (photo – Radhika merchant Instagram)
-
MailOnline च्या मते, ग्रॅमी विजेत्या या गायिकेला अंबानी कुटुंबियांनी या कार्यक्रमासाठी US$5 दशलक्ष म्हणजे अंदाजे ४१.४ कोटी रुपये दिले आहेत.(photo -AP)
-
पण यात आश्चर्यकारक काही नाही कारण अंबानी यांनी यापूर्वी २०१८ मध्ये त्यांची मुलगी ईशाच्या लग्नात परफॉर्म करण्यासाठी Beyonce ला US$6 दशलक्ष दिले होते. (photo – Radhika merchant Instagram)
-
रिहाना व्यतिरिक्त, अमेरिकन गायक आ जे ब्राउन आणि मल्टी-इंस्ट्रुमेंटलिस्ट, गीतकार, निर्माता आणि बासवादक ॲडम ब्लॅकस्टोन देखील जामनगरला पोहोचले आहेत. (photo – @rihanna / facebook)
-
बुधवारी, अंबानी कुटुंबाने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधी स्थानिक समुदायाचे आशीर्वाद घेण्यासाठी ‘अन्न सेवा’ आयोजित केली. (photo – Radhika merchant Instagram post)
-
भोजनानंतर उपस्थितांनी पारंपरिक लोकसंगीताचा आस्वाद घेतला. सुप्रसिद्ध गुजराती गायक कीर्तिदान गढवी यांनी आपल्या गायनाने या कार्यक्रमात चार चांद लावले.(photo – Radhika merchant Instagram post)
-
यामुळे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग फंक्शनसाठी ग्रँड तयारी सुरु आहे. (photo – Radhika merchant Instagram post)
-
विवाहपूर्व होणाऱ्या कार्यक्रमांत पाहुण्यांना भारतीय संस्कृतीचे सौंदर्य अनुभवता येणार आहे. या पाहुण्यांना कच्छ आणि गुजरातच्या लालपूरच्या महिला कारागिरांनी बनवलेले पारंपरिक स्कार्फ भेट म्हणून मिळतील. (photo – Radhika merchant Instagram post)
-
प्री-वेडिंग फंक्शनला बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंतचे सेलिब्रिटी हजेरी लावताना दिसणार आहेत. (photo – Radhika merchant Instagram post)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”