-
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनची पहिला रात्र फार धमाकेदार होती. देश-विदेशांतील जवळपास सर्वच प्रसिद्ध व्यक्ती या सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. यातच अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनच्या दुसऱ्या दिवसातील नवे फोटो सोशल मीडियावर होत आहे. (twitter)
-
यात नेहमी आपल्या एलिगंट आणि क्लासी लुकमुळे चर्चेत असणाऱ्या नीता अंबानी आजही तितक्याच आकर्षक दिसत आहेत.
-
अंबानी कुटुंबीय या प्री-वेडिंग सेलिब्रेशनच्या पहिल्या दिवशी आकर्षक अशा कॉकलेट ड्रेसनंतर दुसऱ्या दिवशी पूर्णपणे पारंपारिक लूकमध्ये दिसले.(twitter)
-
दरम्यान दुसऱ्या दिवशीही अंबानींची सून राधिका मर्चंट देखील सासूप्रमाणे खूप सुंदर दिसत होती. (twitter)
-
प्री-वेडिंग सोहळ्याच्या दुसऱ्या दिवसातील मुकेश अंबानी, नीता अंबानी यांच्यासह अंबानी कुटुंबियांचे अनेक नवे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (twitter)
-
अबू जानी संदीप खोसला यांच्या कलेक्शनमधील या पारंपारिक कपड्यांमध्ये अंबानी कुटुंबीय आकर्षक दिसत आहेत.(twitter)
-
अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग इव्हेंटच्या पहिल्या दिवशी हॉलीवूड पॉप सिंगर रिहानाने आपल्या धमाकेदार पॉप साँग अन् ढासू डान्सने कार्यक्रमात चार चाँद लावले होते. twitter)
-
मुकेश अंबानी, नीता अंबानी यांच्यासह उपस्थित सर्वांनी रिहानाच्या गाण्यांचा खूप आनंद घेतला.twitter)
-
कार्यक्रमात आलेले पाहुणेच नाही तर खुद्द अंबानी कुटुंबालाही तिच्या गाण्यावर नाचण्याचा मोह रोखता आला नाही.twitter)
-
मुकेश अंबानी, नीता अंबानी आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब रिहानाच्या गाण्यांवर नाचताना दिसले. (twitter)
-
या कार्यक्रमासाठी मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर यांच्यासह सुमारे २००० पाहुणे उपस्थित आहे.(twitter)
-
आज प्री-वेडिंग फंक्शनच्या दुसऱ्या दिवशी ‘वाइल्डसाइड वॉक’ अर्थात जंगल सफारीचा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.(twitter)

Today’s Horoscope : शुक्रवारी ‘या’ तीन राशींना लाभेल सुख-समृद्धी; तुम्हाला परिघ योग देणार का कष्टाचे फळ? वाचा राशिभविष्य