-
भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी याचा धाकटा मुलगा अनंत व राधिका मर्चटच्या प्री-वेडिंग सोहळ्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. १ मार्चपासून सुरु झालेल्या या कार्यक्रमाची ३ मार्चला सांगता झाली.
-
या कार्यक्रमात जगभरातील अनेक दिग्गज मंडळीनी उपस्थिती लावली, तसेच हॉलीवूडपासून, बॉलीवूड, दाक्षिणात्य कलाकार या सोहळ्यात सहभागी झाले होते. याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
-
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी हॉलीवूड गायिका रिहाने आपल्या गाण्यावर सगळ्यांना थिरकायला भाग पाडले. तर दुसऱ्या दिवशी बॉलीवूडमधील कलाकारांचा एकापेक्षा एक जबरदस्त डान्स बघायला मिळाला.
-
या कार्यक्रमात नीता अंबानी व मुकेश अंबानी यांनी रोमँटिक गाण्यावर डान्स केला. पण या सगळ्यात लक्ष वेधून घेलले ते अनंत-राधिकाच्या डान्सने.
-
अनंत व राधिकाने ७० च्या दशकातील शम्मी कपूर व मुमताज यांच्या ‘आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर’ गाण्यावर डान्स केला. विरेंद्र चावला यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेयर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये दोघे रोमँटिक डान्स करताना दिसले.
-
सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
-
दरम्यान अनंत व राधिकाच्या प्री वेडिंग कार्यक्रमासाठी अंबानी कुटुंबाने पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. ‘मेन्स एक्सपी’च्या रिपोर्टनुसार तीन दिवासाच्या या शाही कार्यक्रमासाठी अंबानी यांनी जवळपास १ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत.
-
या कार्यक्रमांसाठी आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनाही आमंत्रित करण्यात आले होते. या सेलिब्रिटींनी त्यांच्या परफॉर्मन्ससाठी किती मानधन घेतले जाणून घेऊया.
-
राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या कार्यक्रमात इंटरनॅशनल स्टार रिहानाने खास परफॉर्मन्स दिला. (Instagram Acc)
-
यासंबंधीचे तिचे मानधन गुप्त ठेवण्यात आले असले तरीही काही मीडिया रिपोर्ट्सनुसार रिहाना कोणत्याही खाजगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी १.५ ते ८ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास ६६ कोटी रुपयांची मागणी करते. (Instagram Acc)
-
असे सांगण्यात येते की राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या कार्यक्रमातील परफॉर्मन्ससाठी रिहानाने जवळपास ५६ कोटी रुपये घेतले आहेत. (Instagram Acc)
-
२०१८ मध्ये ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या संगीत समारंभासाठी क्वीन बे स्वतः उदयपूरला आली होती. तिच्या परफॉर्मन्सने सर्वांनाच थक्क केले होते. (Instagram Acc)
-
राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या कार्यक्रमासाठी बियॉन्सेने सुमारे ३३ कोटी रुपये आकरले असल्याचे काही रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे. (Instagram Acc)
-
सेंट मॉरिट्झमधील आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांच्या विंटर-वंडरलँड-थीम असलेल्या प्री-वेडिंग बॅशमध्ये कोल्डप्लेच्या ख्रिस मार्टिनने त्याच्या उत्कृष्ट हिट्सने पाहुण्यांना मंत्रमुग्ध केले. (Instagram Acc)
-
सेलिब्रिटी टॅलेंट इन्फॉर्मेशनने दिलेल्या माहितीनुसार मार्टिनने खाजगी परफॉर्मन्ससाठी $९,९९९ म्हणजेच अंदाजे ८ कोटी रुपये मानधन घेतले होते. (Instagram Acc)
-
ॲडम लेविनने २०१९ मध्ये मुंबईत आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांच्या मंगल पर्व समारंभासाठी मरुन 5 बँडचे नेतृत्व केले. बँडने त्यांच्या अद्भुत परफॉर्मन्ससाठी $१-१.५ दशलक्ष म्हणजेच जवळपास ८ ते १२ कोटी शुल्क आकारले होते. (Instagram Acc)
-
इटलीतील लेक कोमो येथे ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या एंगेजमेंट सोहळ्यात जॉन लीजेंडने सादरीकरण केले. त्यांनी किली मानधन घेतले याचा आकडा अज्ञात असला तरीही तो खाजगी लग्नाच्या कार्यक्रमासाठी प्रवास आणि इतर खर्च वगळून साधारणपणे १ दशलक्ष डॉलर म्हणजेच जवळपास कोटी आकारतो. (Instagram Acc)
-
दरम्यान, अनंत व राधिकाच्या प्री वेडिंग कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या पाहुण्यांना जेवणात २५०० प्रकारचे पदार्थ चाखायला मिळत आहेत. यासाठी इंदौरवरुन ६५ आचाऱ्यांना बोलवण्यात आले आहे.
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख