-
भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी याचा धाकटा मुलगा अनंत व राधिका मर्चटच्या प्री-वेडिंग सोहळ्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. १ मार्चपासून सुरु झालेल्या कार्यक्रमाची सांगता झाली आहे. (फोटो – मिकी कॉन्ट्रॅक्टर/इन्स्टाग्राम अकाउंट)
-
या कार्यक्रमात बॉलीवूडपासून हॉलीवूडपर्यंत अनेक कलाकारांनी त्यांच्या स्टाइल स्टेटमेंट सादर केल्या. मात्र या सगळ्यात नीता अंबानी यांच्या लूक्सने सर्वांनाच वेड लावले. (फोटो – मिकी कॉन्ट्रॅक्टर/इन्स्टाग्राम अकाउंट)
-
सर्व अंबानी महिलांनी प्री-वेडिंग कार्यक्रमांमध्ये उत्तमोत्तम फॅशनेबल कपडे परिधान केले होते. तथापि, नीता अंबानी यांचे लूक्स प्रत्येकवेळी सर्वांचे लक्ष वेधून घ्यायचे. (फोटो – मिकी कॉन्ट्रॅक्टर/इन्स्टाग्राम अकाउंट)
-
अलीकडेच नीता अंबानी यांनी परिधान केलेल्या हिऱ्याच्या नेकलेसबद्दल काही बातम्या समोर आल्या आहेत. या एका नेकलेसची किंमत कोट्यवधीच्या घरात आहे. (फोटो – मिकी कॉन्ट्रॅक्टर/इन्स्टाग्राम अकाउंट)
-
३ मार्च २०२४ रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-फंक्शनच्या शेवटच्या कार्यक्रमासाठी, नीता अंबानी यांनी हातमाग कांचीपुरम साडीची निवड केली. ही साडी प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी रिलायन्सच्या लक्झरी रिटेल ब्रँड स्वदेशच्या सहकार्याने डिझाइन केली आहे. (फोटो – मनीष मल्होत्रा/इन्स्टाग्राम अकाउंट)
-
साडीमध्ये स्कॅलप्ड बॉर्डरवर क्लासिक पारंपारिक जरदोसी वर्क आणि नाजुक नक्षीकाम केले आहे. यावेळी त्यांनी स्लीव्हजवर सुंदर गोटा वर्क केलेला मॅचिंग ब्लाऊज निवल होता. (फोटो – मनीष मल्होत्रा/इन्स्टाग्राम अकाउंट)
-
त्यांनी स्मोकी आय, पातळ आयलायनर, न्यूड लिपस्टिक, लाल टिकली, आणि मध्ये भांग असलेला हेअर बन अशा आपल्या सिग्नेचर मेकअपसह त्यांचा लूक पूर्ण केला. (फोटो – मनीष मल्होत्रा/इन्स्टाग्राम अकाउंट)
-
शिवाय, नीता यांनी उत्कृष्ट दर्जाचा पन्ना जडलेल्या हिऱ्याच्या दागिन्यांची निवड केली होती. त्यांनी एक लांब हार परिधान केला होता ज्यामध्ये दोन मोठ्या आकाराच्या पेंडेंटला जोडलेले छोटे पन्ना, सोबत मॅचिंग स्टड कानातले, बांगड्या आणि स्टेटमेंट रिंग होती. (फोटो – मनीष मल्होत्रा/इन्स्टाग्राम अकाउंट)
-
नीता यांच्या गळ्यातील पन्ना आणि हिऱ्यांचा आकार पाहता, तो खूप महागड्या कॅरेटचा आहे, हे सहज कळते. एका रिपोर्टनुसार नीता यांच्या दागिन्यांची किंमत खूप जास्त आहे. रिपोर्टनुसार, नेकलेसची किंमत सुमारे ४०० ते ५०० कोटी रुपये इतकी सांगण्यात येत आहे. (फोटो – मनीष मल्होत्रा/इन्स्टाग्राम अकाउंट)

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य