-
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया आणि सर्वत्र देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकडा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याची चर्चा सुरु आहे. (photo – sachin tendulkar/ instagram)
-
अनंत-राधिकाचा भव्य प्री-वेडिंग सोहळा १ ते ३ मार्चदरम्यान गुजरातमधील जामनगर येथे पार पडला. (photo – instagram)
-
या सोहळ्यासाठी बॉलिवूड स्टार्स, क्रिकेटर्स, उद्योगपतींसह अनेक सेलिब्रिटींनाही हजेरी लावली होती. (photo – instagram)
-
यात क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचाही समावेश होता.(photo – sachin tendulkar/ instagram)
-
सचिन तेंडुलकर त्याची पत्नी अंजली आणि मुलगी सारासह या सोहळ्यासाठी जामगरमध्ये पोहोचला. (photo – sachin tendulkar/ instagram)
-
दरम्यान सोहळ्यातील काही खास फोटो खुद्द सचिननेच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले आहेत. यात सचिनबरोबर पत्नी अंजली आणि मुलगी सारा अगदी पारंपारिक आउटफिटमध्ये दिसतेय. (photo – sachin tendulkar/ instagram)
-
या पोस्टच्या कॅप्शनमध्ये सचिनने गुजराती भाषेत काहीतरी लिहित पुढे लिहिले की, प्रत्येक क्षण उत्साही बनवणाऱ्या लोकांबरोबर, जामनगर येथील काही खास क्षण. (photo – sachin tendulkar/ instagram)
-
सचिनच्या या पोस्टला चाहत्यांनीही खूप पसंती दिली आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, माझे आवडते कपल, भारताचे आवडते कपल (photo – sachin tendulkar/ instagram)
-
प्री-वेडिंग सोहळ्यातील थीमप्रमाणे सचिनसह पत्नी अंजली आणि सारानेही वेगवेगळे आउटफिट परिधान केले होते.(photo – sachin tendulkar/ instagram)
-
दरम्यान सारा तेंडुलकरनेही या सोहळ्यातील तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.(photo – sachin tendulkar/ instagram)
-
साराचे अतिशय सुंदर आणि पारंपारिक ड्रेसमधील हे फोटो चाहत्यांनाही खूप आवडले.(photo – sachin tendulkar/ instagram)

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य