-
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असतात.
-
नुकतेच अमृता फडणवीस यांनी जागतिक महिला दिनानिमित्त आपले ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहे.(photo- @nirmooha/ instagram)
-
अमृता फडणवीस यांनी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत ‘Hey woman be a girl’ या कॅप्शनसह आपले हटके फोटो पोस्ट केलेत.
-
फोटोतील अमृता फडणवीस यांचा अंदाज फारच ग्लॅमरस दिसत आहे. सोनेरी रंगाचा गाऊन आणि त्यावर फिकट भगव्या आणि जांभळ्या रंगाचे जॅकेट घालून त्यांनी सर्वांच्याच नजरा वेधून घेतल्या.
-
त्यांच्या या फोटोला सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे. त्यांचे अनेक चाहते त्यांच्या या फोटोवर कमेंट्स करत आहेत.
-
काहींनी कमेंट्समध्ये मिसेस उपमुख्यमंत्र्यांची तुलना थेट पॉप सिंगर रिहानाशी केली आहे.
-
तर काहींनी अमृता फडणवीसांचे हे फोटो पाहून त्या सिनेसृष्टीत पदार्पण करतायत की असा सवाल केला आहे.
-
अलौलिक सुंदरता, अद्वितीय सौंदर्य म्हणत काही चाहत्यांनी त्यांच्या फोटोंना चांगलीच पसंती दिली आहे.
-
यामुळे आपल्या वक्तव्य आणि गाण्यांमुळे चर्चेत असणाऱ्या अमृता फडणवीस आता या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आल्या आहेत. (सर्व फोटो सौजन्य : अमृता फडणवीस/इन्स्टाग्राम)
Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…