-
७१ व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचा सोहळा ९ मार्च रोजी मुंबई येथे संपन्न होत आहे. तब्बल २८ वर्षांनंतर ही स्पर्धा भारतात होत आहे. यानिमित्ताने भारतीय स्पर्धक सिनी शेट्टी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटविण्यासाठी सज्ज झाली आहे.
-
२२ वर्षीय सिनी शेट्टी मुळची कर्नाटकची आहे. मात्र तिचा जन्म मुंबईत झाला होता. ती मिस इंडिया स्पर्धेत ११२ देशांतील सौंदर्यवतींशी स्पर्धा करेल.
-
मुंबईच्या विद्याविहार येथील एस.के. सोमय्या महाविद्यालयातून सिनीने अकाऊंटींग आणि फायनान्समध्ये पदवी घेतली.
-
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सिनी शेट्टी म्हणाली की, मी भारतातील १४० कोटी जनतेचे प्रतिनिधित्व या स्पर्धेत करत आहे. भारताची संस्कृती, विविधता, परंपरा, भारतीय भावनांचे सादरीकरण मी आंतरराष्ट्रीय मंचावर करणार आहे. यासाठी मी अत्यंत उत्साहीत आहे.
-
सिनी शेट्टीने याआधी ‘मिस इंडिया २०२२’ या स्पर्धेत विजय मिळविला होता.
-
सिनी शेट्टी सध्या चार्टर्ड फायनान्शिअल अॅनालिस्ट म्हणून काम करत आहे.
-
सिनी शेट्टी ही भरतनाट्यम शिकली असून तिने आपल्या कलेचं सादरीकरण मिस वर्ल्डच्या मंचावर केलं आहे. याचा एक व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आहे.
-
सिनी शेट्टी म्हणाले की, माजी मिस वर्ल्ड आणि अभिनेत्री प्रियांका चोप्राकडून तिला प्रेरणा मिळाली.
-
आतापर्यंत ऐश्वर्या राय, प्रियंका चोप्रा, मनुषी छिल्लर यांनी मिस वर्ल्ड हा खिताब जिंकलेला आहे. ९ मार्च रोजी सिनी शेट्टीदेखील विजेती ठरणार का? याचा निर्णय होईल.

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी