-
चेक रिपब्लिकची क्रिस्टिना पिस्कोव्हा ने ७१वी ‘मिस वर्ल्ड’ आवृत्ती जिंकली. ‘मिस वर्ल्ड’ या स्पर्धेमध्ये 110 हून अधिक देशांच्या सौंदर्यवतींनी भाग घेतला होता. ( फोटो: क्रिस्टिना पिस्कोव्हा अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
लेबनॉनच्या याश्मिना झायटॉनने प्रथम उपविजेतेपद पटकावले. ( फोटो: क्रिस्टिना पिस्कोव्हा अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
गेल्या वर्षीची विजेती कॅरोलिना बिलावस्का ने क्रिस्टिनाच्या डोक्यावर ‘मिस वर्ल्ड’चा क्राउन घातला. ( फोटो: क्रिस्टिना पिस्कोव्हा अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
‘मिस वर्ल्ड’स्पर्धेच्या परीक्षणासाठी १२ विशेष सदस्य उपस्थित होते. यामध्ये बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन, पूजा हेगडे, मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या सीईओ ज्युलिया एव्हलिन मॉर्ले, अमृता फडणवीस, साजिद नाडियाडवाला, हरभजन सिंग, रजत शर्मा, विनीत जैन, मिस वर्ल्ड इंडियाचे चेअरमन आणि हॉस्ट जामिल सैदी. (फोटो: क्रिती सेनॉन अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
याशिवाय पूर्वाश्रमीच्या ३ ‘मिस वर्ल्ड’विजेत्या देखील इथे उपस्थित होत्या. ‘मिस वर्ल्ड २०२४’चा महाअंतिम सोहळ्याचे सूत्रसंचालन करण जोहर व ब्यूटी क्वीन मेगन यांग यांनी केलं. (फोटो: करण जोहर अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
तर जाणून घेऊया ‘मिस वर्ल्ड २०२४’क्रिस्टिना पिस्कोव्हा बद्दल… ( फोटो: क्रिस्टिना पिस्कोव्हा अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
१९ जानेवारी १९९९ साली जन्माला आलेली क्रिस्टिना पिस्कोव्हा ही चार्ल्स युनिव्हर्सिटी येथे कायद्याचे आणि बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनची विद्यार्थिनी आहे. २४ वर्षांची क्रिस्टिनाने शिक्षणाबरोबर मॉडेलिंगचं करिअर निवडलं आणि तंजानियामधील सोनटा फाउंडेशनसाठी क्रिस्टिना वंचित मुलांना इंग्रजी शिकवते. ( फोटो: क्रिस्टिना पिस्कोव्हा अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
क्रिस्टिनाला संगीत व कला क्षेत्रात खूप रस आहे. तिला बासरी व व्हायोलिन वाजण्याची आवड आहे. या क्षेत्रामध्ये तिने ९ वर्ष घालवली आहेत. ( फोटो: क्रिस्टिना पिस्कोव्हा अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
क्रिस्टिनाला इंग्रजी, पॉलिश, स्लोवॉक आणि जर्मन या भाषा येतात. चेक रिपब्लिकची क्रिस्टिना ही दुसरी ‘मिस वर्ल्ड’आहे. या आधी २००६ मध्ये ताटणा कुचरोवा ने ‘मिस वर्ल्ड’ जिंकले होते. ( फोटो: क्रिस्टिना पिस्कोव्हा अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
![Miss-World-2024-krystyna-pyszkova](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/03/432308156_920691709735667_4254126244585271141_n.jpg?w=442)