-
Anant Ambani Watch Price: देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, रिलायन्स इंडस्ट्रीज चेअरमन मुकेश अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानी लग्नबंधनात अडकणार आहे. (फोटो : Instagram)
-
गुजरातमधील जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग सोहळा रंगला होता. (फोटो : Instagram)
-
फंक्शनसाठी संपूर्ण बॉलीवूडसह अनेक दिग्गजांची मंदियाळी सध्या जामनगरमध्ये पाहायला मिळाली. (फोटो : Instagram)
-
दरम्यान याच सोहळ्यातील अनंत अंबानी यांच्या हातातील घड्याळाची जोरदार चर्चा आहे. सोहळ्यादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. (फोटो : Instagram)
-
अनंत अंबानींचं हे आलिशान घड्याळ तब्बल १४ कोटी रुपयांचं आहे. या घड्याळाचं नाव Audemars Piguet Royal Oak Open Worked Skeleton असं आहे. (फोटो : Instagram)
-
‘इंडियन हॉरोलॉजी’ या इन्स्टाग्राम पेजवरून या घडाळ्याबाबत माहिती देण्यात आली आहे. या घडाळ्यात अनेक प्रकारचे फिचर्स आहेत. (फोटो : Instagram)
-
अनंत अंबानींच्या प्रीवेडींग कार्यक्रमात मुकेश अंबानी आणि निता अंबानीही वेगळ्या रुपात पाहायला मिळाले. (फोटो : Instagram)
-
मार्क झुकरबर्गची पत्नी प्रिसिला चॅन यांनी अनंत अंबानी यांच्या आलिशान घड्याळाचे कौतुक केले. चॅनने अनंतच्या लग्झरी घड्याळाचे कौतुक केले आणि म्हटले – ‘तुमचे घड्याळ अप्रतिम आहे, खूप छान आहे.’ (फोटो : Instagram)
-
भारतासहित आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या क्रमवारीत मुकेश अंबानी हे पहिल्या स्थानावर आहेत. तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या क्रमांकवारीत ९ व्या स्थानावर आहेत. (फोटो : Instagram)
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ