-
भारतात दिवसेंदिवस एक्स्प्रेसवेचे जाळं विस्तारत आहे. अनेक राज्यांमधील एक्स्प्रेसवेवर कुठे रुंदीकरणाचे तर कुठे लांबी वाढवण्याचे काम सुरु आहे. (photo – freepik)
-
यात काही एक्सप्रेसवे एकापेक्षा अनेक जिल्ह्यांना तर कुठे राज्यांना जोडणारे आहेत. (photo – freepik)
-
त्यामुळे भारतातील सर्वात लांब, लहान आणि अरुंद अशा एक्स्प्रेसवेविषयी जाणून घेऊ….
-
११ मार्च रोजी देशातील सर्वात लहान एक्स्प्रेस वे म्हणजे द्वारका एक्स्प्रेस वेचं उद्धाटन झाले. दिल्ली आणि गुरुग्रामला जोडणारा हा एक्स्प्रेस वे केवळ १८.७ किमी लांबीचा आहे. परंतु याने लाखो लोकांचा वेळ वाचणार आहे.
-
यामुळे द्वारका एक्स्प्रेसवे हा देशातील सर्वात लहान एक्स्प्रेसवे म्हणून ओळखला जाईल. तर दिल्ली- मुंबई हा देशातील सर्वात लांब एक्स्प्रेसवे आहे.
-
दिल्ली – मुंबई एक्स्प्रेसवेची एकूण लांबी १३५० किमी असेल. तर दिल्ली मेरठ हा देशातील सर्वात रुंद एक्स्प्रेसवे आहे. या एक्स्प्रेसवेची एकूण लांबी ९६ किमी आहे.
-
या एक्स्प्रेसवेचा एक भाग हा दिल्ली ते डासना एकूण २८ किमीचा आहे. एकूण १४ लेनचा हा एक्स्प्रेसवे आहे. अशाप्रकारे दिल्ली ते यूपी बॉर्डरपर्यंतही १४ लेन आहेत. याशिवाय सायकल ट्रॅकचा समावेश आहे.
-
देशातील सर्वात पहिला एक्स्प्रेसवे म्हणजे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे. पण या एक्स्प्रेसवेवर फक्त ६ लेन आहेत.
-
२०२२ मध्ये हा एक्स्प्रेसवे सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला होता. ड्रायव्हिंगची आवड असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे या एक्स्प्रेसवेवर ड्रायव्हिंग करण्याचे स्वप्न असते. (सर्व फोटो सौजन्य – लोकसत्ता संग्रहित आणि freepik)
येणाऱ्या ४७ दिवसात मंगळ देणार गडगंज श्रीमंती; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार