-
स्मार्टफोनवरील कोणतेही काम इंटरनेटशिवाय पूर्ण होत नाही. तर इंटरनेटसाठी अनेकांच्या घरात वाय-फाय हा पर्याय असतो. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
मात्र, काही जण मोबाईल डेटा पॅकवर अवलंबवून असतात. पण, मोबाईल डेटा दिवसभर टिकत नाही. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
त्यामुळे आज आपण हा मोबाईल डेटा सेव्ह करण्यासाठी काही पर्याय पाहणार आहोत. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
१. डेटा सेव्हर मोड – डेटा सेव्हर हा मोड एक उत्तम पर्याय ठरेल. यासाठी अँड्रॉइड फोनच्या सेटिंग्जमध्ये तुम्हाला जावे लागेल आणि मग कनेक्शनवर जाऊन डेटा वापरावर टॅप करा आणि नंतर डेटा सेव्हरवर टॅप करा. मोबाईल डेटाचा वापर कमी करण्यासाठी या पर्यायाचा वापरकेला जाऊ शकतो. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
२. डेटाचा वापर कमी करण्यासाठी आवश्यक नसलेले बॅकग्राऊंडमधील रिसेन्ट ॲप क्लिअर करा. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
३. जेव्हा शक्य असेल तेव्हा वायफाय वापरा – मोठ्या फाईल्स डाउनलोड करण्यासाठी मोबाइल डेटा वापरणे टाळा आणि वाय फाय नेटवर्कशी कनेक्ट करा.(फोटो सौजन्य: @Freepik )
-
४. तुमच्या स्मार्टफोनमध्ये असलेल्या अॅप्सपैकी कोणते अॅप्स सर्वाधिक डेटा वापरते याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सेटिंग्जमध्ये जाऊन कोणते मोबाइल अॅप सर्वाधिक डेटा वापरत आहे हे तुम्ही तपासू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
५. सोशल मीडियावर एखादा ॲप स्क्रोल करताना त्यातील व्हिडीओ आपोआप प्ले होतो आणि तुमचा मोबाईल डेटा जास्त वापरला जातो. डेटा वाचवण्यासाठी ॲप्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील स्वयंचलितपणे व्हिडीओ प्ले होण्याची सेटिंग ऑफ करून ठेवा. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
६. ऑटो अपडेट बंद करा – फोनमध्ये अनेक अॅप्स हे आपोआप अपडेट होत असतात. त्यामुळे फोनचा डेटा खूप जास्त प्रमाणात वापरला जातो. यासाठी तुम्हाला सेटिंगमध्ये जाऊन ऑटो अपडेट बंद करावं लागेल आणि ऑटो अपडेट अॅप्स ओव्हर वाय फाय ओन्ली हा पर्याय तुम्हाला निवडावा लागेल. (फोटो सौजन्य: @Freepik )

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा