-
पाळीव कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे मृत्यूच्या वाढत्या घटना गांभीर्याने घेत केंद्र सरकारने पिटबुल, जर्मन शेफर्ड, रॉटवेलरसह विविध २३ जातीच्या कुत्र्यांच्या विक्रीवर बंदी घातल्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
-
केंद्रीय पशुसंवर्धन मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून ही बंदी लागू करण्यास सांगितली आहे.
-
दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे. तज्ज्ञ समितीच्या सल्ल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे.
-
अलीकडे देशात पाळीव कुत्र्यांनी माणसांवर हल्ले केल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.
-
याची दखल घेत मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाचे सहसचिव डॉ. ओ.पी. चौधरी यांनी राज्यांना पत्र लिहिले आहे.
-
यामध्ये २३ जातीच्या कुत्र्यांच्या विक्रीवरच नव्हे तर त्यांच्या पाळण्यावर आणि प्रजननावरही बंदी घालण्याची सूचना करण्यात आली आहे.
-
सरकारने ही बंदी मिक्सड आणि क्रॉस ब्रीड जातींवर लागू करण्यास सांगितली आहे.
-
या जातींमध्ये पिटबुल, रॉटवेलर, टेरियर, टोसा इनू, अमेरिकन स्टॅफोर्डशायर टेरियर, फिला ब्राझेलरियो, डोगो अर्जेंटीनो, अमेरिकन बुलडॉग, बोझबोएल, कँगल, सेंट्रल एशियन शेफर्ड डॉग,
-
कॉकेशियन शेफर्ड डॉग, जपानी टोसा, कॅनारियो, रोडेशियन रिजबॅक अक्बाश, जॅपनीज टोसा, वोल्फ डॉग, मॉस्को गार्ड, केन कॉर्सो, टोरनजॅक आणि टॉर्नजॅक यांचा समावेश आहे.
-
पत्रानुसार, केंद्र सरकारने प्राण्यांची क्रूरता रोखण्यासाठी डॉग ब्रीडिंग अँड मार्केटिंग नियम २०१७ आणि पेट शॉप नियम २०१८ लागू करण्यास सांगितले आहे.
-
पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स (पेटा) इंडियाने या संदर्भात अपील केले होते. पेटाने यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात रिट याचिकाही दाखल केली होती.
-
देशातील कुत्र्यांच्या हल्ल्याच्या वाढत्या घटना पाहता पेटाने मानवाबरोबर असुरक्षित कुत्र्यांच्या सुरक्षाबाबतही आवाहन केले होते.
-
दरम्यान भारतात गेल्या काही दिवसांत पिटबुल जातीच्या कुत्र्याच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर ३ जण गंभीर जखमी झाल्याच्या घटना समोर आल्या.
-
दरम्यान अमेरिकेतही कुत्रा चावल्याने झालेल्या एकूण मृतांमध्ये पिटबुल्स जातीच्या कुत्र्याने चावल्याने झालेल्या मृतांचे प्रमाण जवळपास ६६ टक्के आहे. (सर्व फोटो – freepik)
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच