-
पुण्यातील कात्रज येथे स्थित राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील हत्ती व बंगाल टायगरच्या उन्हाळी सुट्टीचे काही खास फोटो आज आपण पाहणार आहोत.
-
गुरुवारी तापमानात वाढ झाल्यावर २४ वर्षांच्या मादी हत्ती मीरा आणि जानकी या कात्रज प्राणीसंग्रहालयातील जलतरण तलावात खेळताना दिसून आल्या
-
तर उन्हाच्या वाढत्या झळांचा दाह कमी करण्यासाठी, लक्ष्मी, (पांढरी वाघीण) व बंगाल टायगर यांनी सुद्धा थंडगार पाण्यात बसून आनंद लुटला, या क्षणांचे काही सुंदर छायाचित्र एक्सप्रेस फोटोग्राफर अरुल होरायझन यांनी टिपले आहेत
-
आज या सुंदर फोटोसंह या प्राणिसंग्रहालयाविषयी सुद्धा थोडी माहिती जाणून घेऊया, पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, सन १९९६ मध्ये कात्रज येथील १३० एकर जागेत नैसर्गिक आभासाचे, प्राणी प्रजोत्पनासाठी, वन्यजीव संवर्धन शिक्षण व संशोधन करण्यासाठी नवीन प्राणीसंग्रहालयाचा विकास करण्यात आला होता
-
१४ मार्च २०१४ रोजी राजीव गांधी प्राणीसंग्रहालय व वन्यजीव संशोधन केंद्र असे नामकरण करून नवीन प्राणीसंग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले
-
सुरूवातीला हरीण, माकड, अस्वल, वाघ, हत्ती इत्यादी साठी नैसर्गिक आभासाचे खंदक बांधण्यात आले. १९८६ साली स्थापन करण्यात आलेले जुने सर्पउद्यान देखील नवीन प्राणिसंग्रहालयात समाविष्ट करण्यात आले.
-
सद्यस्थितीत प्राणीसंग्रहालयात पश्चिम घाटातील जैविविवधता दर्शविणारे सस्तन प्राणी, पक्षी व सरपटणारे प्राणी अशा एकूण ६६ जातींचे प्राणी आहेत. व या प्राण्यांवर उपचार करण्यासाठी विविध साधनांनी युक्त असे हॉस्पिटल सुद्धा आहे
-
या प्राणीसंग्रहालयाला दरवर्षी १८ लाख पेक्षा अधिक पर्यटक भेट देत असल्याचे पुणे महानारपालिकेने सांगितले आहे. इथे पर्यटकांच्या सोयीसाठी स्वच्छता गृह, पिण्याचे पाणी, सूचना फलक, व्हील चेअर इ. गोष्टी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत
-
प्राणी प्रेमींसाठी इथे विविध योजना राबवल्या जातात. यातील प्राणी दत्तक योजनेअंतर्गत आपण एक दिवस ते पाच वर्षे अशा विविध कालावधींसाठी प्राण्यांच्या संगोपनाच्या खर्चासाठी योगदान देऊ शकता
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ