-
निवडणूक आयोगाने १८ व्या लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. देशात लोकसभा २०२४ च्या निवडणुका सात टप्प्यात होणार आहेत. (संग्रहित फोटो)
-
पण निवडणुकीपूर्वी मतदार यादीत नावे समाविष्ट व्हावीत यासाठी सरकारही सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यात आता मतदार यादीत तुमच्या नावाचा समावेश करणं खूप सोपं झालं आहे. (photo- ap)
-
तुमचे वय १८ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास तुम्ही घरबसल्या तुमचे नाव मतदार यादीत समाविष्ट करू शकता. चला जाणून घेऊ सोप्पी पद्धत… (संग्रहित फोटो)
-
ऑनलाइन मतदार कार्डसाठी अर्ज करण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या वेबसाइट वर जा. यानंतर डावीकडे दिसणाऱ्या पहिल्याच फॉर्म 6 या पर्यायावर क्लिक करा. यानंतर मोबाईल नंबरसह इतर माहिती भरुन तुमचा आयडी तयार करा आणि लॉगिन करा.(voters website)
-
लॉग इन केल्यानंतर, पुन्हा फॉर्म 6 पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमचे राज्य, जिल्हा आणि शहर निवडा.(voters website)
-
तुमचा मोबाईल नंबर, पत्ता, विधानसभा मतदारसंघ यासारखी महत्त्वाची माहिती भरा. यानंतर तुमच्या पालकांच्या मतदार कार्डचा क्रमांक आणि नाव टाका.(voters website)
-
यानंतर आधार क्रमांक, जन्मतारीख टाका आणि आधार कार्डचा फोटो आणि जन्म प्रमाणपत्राचा फोटो अपलोड करा. शेवटी कॅप्चा कोड टाका आणि फॉर्म सबमिट करा.(photo – indian express)
-
फॉर्म सबमिट केल्यानंतर सुमारे एक महिन्याच्या आत मतदार कार्ड तुमच्या घरी पोहोचेल. (फोटो – संग्रहित )
-
सबमिशन केल्यानंतर तुम्हाला एक पावती क्रमांक मिळेल ज्याच्या मदतीने तुम्ही एका आठवड्यानंतर कधीही तुमच्या मतदार फॉर्मची स्थिती तपासू शकाल (फोटो – संग्रहित)
-
तुमचा फॉर्म जरी नाकारला गेला तरी तुम्हाला या नंबरवरून त्याबद्दल माहिती मिळेल. (फोटो – indian express)

नवरदेव पाहताच नवरी भारावली! पाहुण्यांसमोरच केला भन्नाट डान्स; नवरदेवही लाजला…हौशी नवरीचा VIDEO एकदा पाहाच