-
झोमॅटोच्या सीईओ दीपंदर गोयल यांनी मेक्सिकन उद्योजक आणि मॉडेल ग्रेसिया मुनोजशी लग्न केले आहे.
-
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोयल व ग्रेसिया यांचे लग्न एका महिन्यापूर्वी झाले होते आणि ते दोघे फेब्रुवारीमध्ये हनीमूनलाही गेले होते.
-
मेक्सिकोमध्ये जन्मलेली ग्रेसिया मॉडेल आहे. सध्या ती लक्झरी उत्पादनांच्या स्वतःच्या स्टार्टअपवर काम करत आहे.
-
ग्रेसिया मेट्रोपॉलिटन फॅशन वीक, २०२२ ची विजेतीही ठरली आहे.
-
ग्रेसियाने तिच्या इंस्टाग्राम बायोमध्ये बदल करून ‘माझा जन्म मेक्सिकोमध्ये झाला आहे आणि मी आता भारतात, माझ्या घरी आहे.” अशा आशयाची ओळ जोडली आहे.
-
जानेवारीमध्ये ग्रेसियाने ‘दिल्ली दर्शन’ करतानाचे काही फोटो शेअर केले होते.
-
“माझ्या नवीन घरात माझ्या नवीन आयुष्याची एक झलक,” असे लिहित तिने लाल किल्ल्याबरोबरच राजधानी दिल्लीतील काही प्रसिद्ध स्मारकांच्या भेटीचे फोटो पोस्ट केले होते.
-
या फोटोंवर भारतीय युजर्सनी कमेंट करून लग्नाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत.
-
दरम्यान, ४१ वर्षीय गोयल हे प्रसिद्ध फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोचे संस्थापक व सीईओ आहेत.
-
मिळालेल्या माहितीनुसार, झोमॅटोचे सीईओ, गोयल यांचं हे दुसरं लग्न असून आयआयटी-दिल्लीमध्ये शिकत असताना त्यांची कांचन जोशी यांच्याशी भेट झाली होती.
-
या दोघांनी लग्नगाठ बांधली पण काही काळ एकत्र राहिल्यानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. आता गोयल दुसऱ्यांदा विवाहबद्ध झाले आहेत.
-
२००८ मध्ये त्यांनी आपल्या राहत्या घरातूनच ही कंपनी सुरु केली होती. त्यावेळेस झोमॅटोचे नाव ‘फूडीबे’ असे ठेवण्यात आले होते.
-
सध्या भारतातील १००० हुन अधिक शहरांमध्ये झोमॅटोचा व्यवसाय पसरला आहे.
-
अलीकडेच झोमॅटोने ‘शुद्ध शाकाहारी’ डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हजना वेगळी ओळख देण्यासाठी हिरव्या रंगाचा ड्रेस कोड घोषित केला होता. पण यावरून सोशल मीडियावर प्रचंड टीका झाल्याने कंपनीने हा निर्णय मागे घेतला.
-
कंपनीचे सध्याचे मूल्य सुमारे दीड लाख कोटी रुपये सांगण्यात येत आहे. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दीपंदर गोयल यांच्या नावाचा समावेश आहे. याशिवाय त्यांची एकूण संपत्ती सुमारे २५७० कोटी रुपये आहे.
बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल