-
उन्हाळ्यात जसं आपल्याला गरम होतं, तहान लागते अगदी तसंच प्राण्यांचे सुद्धा असते. या दिवसांमध्ये प्राण्यांना थंड आणि स्वछ पाणी द्यावे लागते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पुरेसे पाणी आणि हवा त्यांना मिळाल्याने प्राणी निरोगी, हायड्रेटेड आणि आनंदी राहतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तर राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात उष्णतेपासून काही प्रमाणात आराम मिळावा म्हणून खास उपक्रम राबवण्यात आला आहे. (फोटो सौजन्य: एक्स्प्रेस छायाचित्र/ पवन खेंगरे)
-
राजीव गांधी प्राणीसंग्रहालय पुणे सातारा महामार्गावर कात्रज येथे वसलेले आहे. (फोटो सौजन्य: एक्स्प्रेस छायाचित्र/ पवन खेंगरे)
-
अनेक वर्षांपासून या प्राणीसंग्रहालयात पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. दरवर्षी लाखो पर्यटक येथे येऊन प्राण्यांना पाहण्याचा आनंद लुटतात. (फोटो सौजन्य: एक्स्प्रेस छायाचित्र/ पवन खेंगरे)
-
उष्णतेपासून प्राण्यांच्या संरक्षणासाठी प्राणीसंग्रहालय सज्ज झाल्याचे दिसून आले आहे.(फोटो सौजन्य: एक्स्प्रेस छायाचित्र/ पवन खेंगरे)
-
कारण प्राणीसंग्रहालयात उन्हाळ्यात उष्णतेपासून प्राण्यांना आराम मिळावा म्हणून एअर-कूलर आणि फॉगिंग मशिन बसवण्यात आले आहेत.(फोटो सौजन्य: एक्स्प्रेस छायाचित्र/ पवन खेंगरे)
-
वाघ, सिंह आणि बिबट्या यांच्या आवारात एअर-कूलर आणि फॉगिंग मशिनची सोय करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य: एक्स्प्रेस छायाचित्र/ पवन खेंगरे)
-
वाघाच्या पिंजऱ्यात फॉगिंग मशिन, पिण्यासाठी पाणी, तर पिंजऱ्या बाहेर एअर-कूलर सुद्धा ठेवण्यात आला आहे. (फोटो सौजन्य: एक्स्प्रेस छायाचित्र/ पवन खेंगरे)
-
वाघ फॉगिंग मशिन लावलेल्या आवारात फेरफटका मारतानाही दिसून आला आहे. (फोटो सौजन्य: एक्स्प्रेस छायाचित्र/ पवन खेंगरे)
महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन