-
रेल्वे सेवा हे भारतातील सर्वात महत्त्वाचे वाहतुकीचे साधन आहे. आपल्या देशात दररोज कोट्यावधी लोक रेल्वेने प्रवास करतात.
-
भारतात रेल्वेचा प्रवास हा सर्वात सोपा आणि सोयीस्कर प्रवास मानला जातो. भारतीय रेल्वेचे जाळे दूरवर पसरलेले आहे.
-
भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे आणि आशियातील दुसरे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे.
-
भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी वेळोवेळी सुविधा देत असते. आता भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी १ एप्रिलपासून आपल्या नियमात मोठा बदल करणार आहे.
-
या रेल्वेच्या नव्या नियमामुळे रेल्वेने विना तिकीट प्रवास करणे आता प्रवाशांना महाग पडू शकते.
-
बदललेल्या नियमानुसार, जर विना तिकीट रेल्वेमध्ये प्रवास करताना पकडले गेले तर तुम्हाला आता ऑनलाईन दंड भरावा लागू शकतो.
-
आता भारतीय रेल्वेनेही डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत फुकट्या प्रवाशांकडून दंड आकारण्याची पद्धत सुरु केली आहे.
-
रेल्वेतून विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून आता क्यूआर कोड स्कॅन करून दंड वसूल केला जाणार आहे.
-
यासाठी रेल्वे तिकिट तपासणीसांना हँडहोल्ड टर्मिनल मशीन प्रदान करण्यात येणार आहे.
-
प्रवासादरम्यान तिकिटाविना पकडले गेल्यास आणि कॅश नसेल, अशावेळी डिजिटल पेमेंट करु शकतो आणि तुरुंगात जाण्यापासून वाचू शकतो.
-
१ एप्रिल पासून रेल्वेच्या जनरल तिकिटांच्या पेमेंटसाठी डिजिटल QR ला कोडला देखील मान्यता देण्यात आली आहे. यामुळे युपीआयद्वारे जनरल रेल्वे तिकिट देखील खरेदी करु शकता.
-
रेल्वेस्थानकांवरील लांबच्या गर्दीपासून दिलासा देण्यासाठी रेल्वेने डिजिटल इंडियाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. (फोटो सौजन्य : indian express)

Horoscope Today: संकष्टी चतुर्थीला बाप्पा मेष ते मीनची कोणती इच्छा पूर्ण करणार? तुम्हाला फायदा होईल की नुकसान? वाचा राशिभविष्य