-
टोल नाक्यावर अनेकदा कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरुन टोल कर्मचाऱ्यांशी वाद होतात, यावेळी टोल नाक्यावरील कर्मचारी कार चालकाबरोबर गैरवर्तन करताना दिसतात.
-
यात चालकांना शिवागाळ करण्यासह टॅगिंग होत नसल्यास जबरदस्तीने विविध कंपन्यांचे टोल भरण्यासाठीचे कूपन्स विकत घेण्यास भाग पाडले जाते.
-
कारने कोणत्याही रस्त्यांवरुन प्रवास करताना तुम्हाला ठरावीक अंतराने अनेक टोल नाक्यांवर टोल भरावा लागतो. त्यानंतर तुम्हाला पुढच्या प्रवासाठी सोडले जाते.
-
वाहनाच्या विंडशील्डवरील फास्टॅग स्टिकरवरून आता टोल टॅक्स कापला जातो, म्हणून कोणत्याही वाहन चालकाला आपले वाहन घेऊन जास्तवेळ लांब रांगेत उभे राहावे लागत नाही.
-
पण टोल नाक्यावर गेल्यानंतर अनेकदा फास्टॅग टोल बूथमधील तांत्रिक अडचणी किंवा इतर काही कारणा वरुन वाद होतात.
-
अनेकदा टोल नाक्यावरील कर्मचारी गुंदगिरी करत् लोकांशी गैरवर्तन करतात, तर काही वेळा मारहाणही करतात.
-
पण टोल प्लाझावर तुम्ही कधी अशा गैरवर्तनाचा सामना करावा लागला तर तुम्ही NHAI हेल्पलाइन क्रमांक 02672-252401, 252402 वर तक्रार करू शकता.
-
तुम्हाला काही समस्या किंवा अडचणी येत असल्यास किंवा फास्टॅगबाबत काही तक्रार असल्यास तुम्ही टोल फ्री क्रमांक 1033 वर कॉल करू शकता. (photo -financialexpress)
-
अशा प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी, NHAI ने काही महिन्यांपूर्वी सूचना जारी केल्या होत्या, ज्यानुसार टोल नाक्यावर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी बॉडी कॅमेरे घालणे आवश्यक आहे, जेणेकरून टोलवर घडणाऱ्या घटनांची नोंद करता येईल.( phot o – financialexpress आणि संग्रहित फोटो)

महामार्ग वाहतूक कोंडीमुक्तीच्या दिशेने पहिले पाऊल; संयुक्त कारवाईमध्ये महामार्गालगतची २०१ अतिक्रमणे हटविली