-
सध्या स्मार्टफोनमुळे अनेक कामं सोपी झाली आहेत. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
स्वयंपाक घरातील सिलेंडर बूक करण्यापासून ते ऑफिसमधील अनेक महत्वाची कामं घरबसल्या करणं शक्य झालं आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पण, ही महत्वाची काम करण्यासाठी आपण स्मार्टफोनमध्ये अनेक ॲप्स इंस्टाल करतो. त्यामुळे फोन अनेकदा हँग होतो. तर तुमचाही स्मार्टफोन सतत हँग होत असेल तर तुम्ही पुढीलप्रमाणे काही उपाय करून पाहा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तुमचा फोन रीस्टार्ट करा – सगळ्यात आधी स्मार्टफोन रिस्टार्ट करा. पॉवर बटण दाबून रिस्टार्ट किंवा रिबूट करा. त्यामुळे सॉफ्टवेअरमधली काही किरकोळ समस्या दूर होऊ शकतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
स्क्रीनवर जाऊन तुम्ही वापरत नसलेले अनावश्यक अॅप बंद करा. यामुळे मोबाईल सुरळीत चालण्यास मदत होईल. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
ॲप कॅशे फाइल्स क्लिअर करा – स्मार्टफोनमधील अॅप्स मेन्यूमध्ये जाऊन निवडक अॅप्स निवडा. त्यात स्टोरेजवर टॅप करून क्लिअर कॅशे हा पर्याय निवडा त्यामुळे अनावश्यक फाईल्स काढून टाकल्या जातील. त्यामुळे फोन सुरळीतपणे चालेल. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
सॉफ्टवेअर अपडेट करा – एक्स्पायर्ड ॲप किंवा ऑपरेटिंग सिस्टममुळे अनेकदा फोन हँग होतो. त्यामुळे तुमचा फोन वेळोवेळी ॲप्स आणि ऑपरेटिंग सिस्टम उपडेट आहेत का याची खात्री करून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
स्टोरेज क्लिन करा – फोनमध्ये स्टोरेजसाठी अनावश्यक फाइल्स आणि ॲप्स डिलिट करा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
फॅक्टरी रीसेट – सर्व प्रयत्न करूनही मोबाईल सुरळीत झाला नाही. तर फॅक्टरी रीसेट हा पर्याय निवडा. त्यापूर्वी आपल्या डेटाचा बॅकअप घ्या. कारण यात सगळा डेटा डिलीट होतो. तुम्ही सेटिंग्जमध्ये जाऊन फॅक्टरी रीसेट पर्याय निवडू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)

पिंपरी- चिंचवड: कुख्यात गुंडाकडून ईदच्या शुभेच्छा; महानगर पालिका, पोलिसांनी केली अशी कारवाई