-
भारतातील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक असलेला शो म्हणजे ‘मास्टरशेफ इंडिया’. तर याच कार्यक्रमामुळे देशभरात प्रसिद्ध झालेला चेहरा म्हणजे शेफ कुणाल कपूर.
-
सध्या कुणाल वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. कुणालने आपल्या पतीपासून घटस्फोट घेतला आहे.
-
काल म्हणजेच २ एप्रिल रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने कुणालच्या घटस्फोटाच्या याचिकेला मंजूरी दिली आहे.
-
कुणालला पत्नीकडून मिळणारी हीन वागणूक क्रूरतेसमान असून याच आधारावर दिल्ली हायकोर्टाने या घटस्फोटाला परवानगी दिली आहे.
-
कुणालने २००८ साली लग्न केले आणि त्याच्या पत्नीने २०१२ साली मुलाला जन्म दिला. ‘मास्टरशेफ इंडिया’ या कार्यक्रमाआधी कुणाल आपल्या पत्नीसह ‘नच बलीये’ या डान्स प्रोग्राममध्येही सहभागी झाला होता.
-
काही काळानंतर पत्नीचे कुणालसाठीचे वागणे बदलले. कुणालने आपल्या पत्नीवर आरोप केले की तिने कुणालबरोबरच त्याच्या पालकांनाही कधीच सन्मान दिला नाही आणि ती त्यांना सातत्याने अपमानित करायची.
-
कुणाल कपूरने याप्रकरणी दिल्ली हायकोर्टात धाव घेण्यापूर्वी कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र येथे त्याची याचिका फेटाळण्यात आली होती.
-
यावरही हायकोर्टाने आपले मत मांडत सांगितले की पत्नीचे वर्तन विवाह कायद्याच्या कलम १३ (१) अंतर्गत येते. त्यामुळे कौटुंबिक न्यायालयाने कुणालची घटस्फोटाची याचिका फेटाळून चुकी केली.
-
कुणाल कपूरला त्याच्या पत्नीने दिलेली वागणूक सन्मान आणि सहानुभूतीपूर्ण नसल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. उच्च न्यायालयाने असेही म्हटले की, सार्वजनिक ठिकाणी पती/पत्नीविरुद्ध निष्काळजीपणाचे कोणतेही कृत्य करणे, हे कायद्याच्या दृष्टीने क्रूरतेसमान आहे.
-
न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठाने सांगितले की, “जर एखाद्या जोडीदाराचे दुसऱ्याशी असे वागणे असेल तर तो विवाहाच्या मूळ भावनेचा अनादर आहे.”
-
दुसरीकडे कुणाल कपूरच्या पत्नीने, कोर्टाची दिशाभूल करण्यासाठी आपल्यावर खोटे आरोप केल्याचा दावा केला होता.
-
कुणाल कपूरच्या पत्नीने सांगितले की, ती नेहमीच कुणालशी तिच्या आयुष्याच्या जोडीदाराप्रमाणे बोलायची आणि त्याच्याशी एकनिष्ठ होती.
-
यावेळी, कुणाल कपूरने तिला अंधारात ठेवले आणि घटस्फोट घेण्यासाठी खोट्या कथा रचल्याचा आरोप तिने केला आहे.
-
इतकंच नाही तर, तिने असेही सांगितले आहे की प्रसिद्धी मिळाल्यानंतर कुणालचे विवाहबाह्य संबंध होते.
-
अशाही चर्चा आहेत की याच विवाहबाह्य संबंधांमुळेच कुणालने आपल्या पत्नीबरोबर घटस्फोट घेतला आहे. (सर्व फोटो : कुयाल कपूर/इन्स्टाग्राम)

बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर