-
कोणतीही गाडी तुम्हाला चालवायची असल्यास, तुमच्याकडे गाडी चालविण्याचा परवाना (लायसन्स) असणे गरजेचे आहे. विना परवाना गाडी चालवणे हा कायद्याने गुन्हा मनाला जातो. पूर्वी ड्रायव्हिंग लायसन्स ऑफलाइन बनविले जात असे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पण, आता तुम्ही घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. तर ऑनलाईन ड्रायविंग लायसन्स काढण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
https://sarathi.parivahan.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या आणि तुमचे संबंधित राज्य (State) निवडा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
‘लर्नर लायसन्स’ (learner license) मेनूवर नेव्हिगेट करा आणि ‘नवीन शिकाऊ परवान्यासाठी अर्ज करा’ (Apply for a new learner license) हा पर्याय निवडा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पडताळणीसाठी OTP जनरेट करण्यासाठी तुमचे आधार कार्डचे डिटेल्स आणि मोबाइल नंबर येथे लिहा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
आवश्यक माहितीसह शिकाऊ लायसन्ससाठी अर्ज फी भरा. (फोटो सौजन्य: @लोकसत्ता. कॉम)
-
Next बटणावर क्लिक करा आणि अर्ज फी भरा.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) येथे तुमच्या ड्रायव्हिंग टेस्टसाठी तारीख निवडा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
दिलेल्या तारखेनुसार, पडताळणी आणि प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांसह (आधार कार्ड, अर्ज, फी स्लिप) RTO ला भेट द्या. चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला वाहन चालविण्याचा परवाना देण्यात येईल.((फोटो सौजन्य: @Freepik)

पिंपरी- चिंचवड: कुख्यात गुंडाकडून ईदच्या शुभेच्छा; महानगर पालिका, पोलिसांनी केली अशी कारवाई