-
भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक मानली जाते. देशातील ७ हजारांहून अधिक रेल्वे स्थानकांवरून २० हजारांहून अधिक प्रवासी गाड्या आणि ७ हजारांहून अधिक मालगाड्या धावतात.
-
दररोज करोडो लोक त्यातून प्रवास करतात. तुम्हीही अनेकदा रेल्वे स्टेशनवर गेला असाल.
-
पण तुम्हाला रेल्वे स्टेशनवर लिहिलेले टर्मिनल, जंक्शन आणि सेंट्रल इत्यादींचा अर्थ माहित आहे का?
-
रेल्वे स्टेशनवर लिहिलेले हे सर्व शब्द स्टेशनबद्दल काही खास गोष्टी सांगतात. त्यामुळे भारतीय रेल्वेशी संबंधित या खास गोष्टींबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया.
-
१) जंक्शन – जंक्शन अशा रेल्वे स्थानकाला म्हटले जाते जिथे कमीतकमी तीन वेगवेगळ्या मार्गांनी ट्रेन येतात. अशा स्थानकांना जंक्शन स्टेशन म्हणतात.
-
याचा अर्थ या स्थानकांवर एकाच वेळी दोनहून अधिक गाड्या येतात. मिळालेल्या माहितीनुसार, मथुरा जंक्शन येथे सर्वाधिक ७ मार्ग आहेत.
-
२) टर्मिनल – स्टेशन टर्मिनल/टर्मिनस स्टेशनमध्ये फरक नाही. ही अशी स्थानके आहेत जिथे येणाऱ्या गाड्या ज्या दिशेने येतात त्यात दिशेने पुन्हा जातात. हे ट्रेन्सचे शेवटचे स्टेशन असते.
-
टर्मिनस किंवा टर्मिनल हा शब्द ‘टर्मिनेशन’ या इंग्रजी शब्दापासून बनला आहे, ज्याचा अर्थ समाप्त होणे असा होतो. जसे आनंद विहार टर्मिनल, छत्रपती शिवाजी टर्मिनस.
-
३) सेंट्रल रेल्वे स्टेशन – कोणत्याही शहरातील सेंट्रल रेल्वे स्टेशन हे सर्वात जुने आणि वर्दळीचे रेल्वे स्थानक मानले जाते.
-
उदाहरणार्थ, शहराची जी स्थानके सर्वात जुनी आहेत आणि जिथे बहुतेक गाड्या जातात, त्यांना सहसा सेंट्रल रेल्वे स्टेशन म्हणतात
-
जसे मुंबई सेंट्रल, कानपूर सेंट्रल, चेन्नई सेंट्रल.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”