-
जगभरात किती श्रीमंत लोक आहेत? त्यांची संपत्ती किती? त्यांच्या संपत्तीचे आणि कमाईचे मार्ग काय? असे विविध प्रश्न तुमच्या आमच्यासह सर्वांनाच पडतात. या प्रश्नांची उत्तरे फोर्ब्सकडून दिली जातात. २०२४ सालातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींची नावे फोर्ब्सने जाहीर केली असून त्यातील पहिल्या १० क्रमांकात भारतातील फक्त एका उद्योगपतीचा समावेश आहे. (फोटो – Forbes)
-
मुकेश अंबांनींसह अनेक जुन्या उद्योदपतींचीच नावे या यादीत सातत्याने येत असतात. (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत फ्रान्सचे LVMH कंपनीचे बर्नार्ड अर्नॉल्ट आणि कुटुंब. यांची एकूण संपत्ती २३३ डॉलर आहे. (फोटो – बर्नार्ड अर्नॉल्ट/X)
-
दुसऱ्या क्रमांकावर एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे सीईओ एलन मस्क असून त्यांची निव्वळ संपत्ती १९४ डॉलर अब्ज आहे.(फोटो – एलन मस्क/X)
-
तिसऱ्या क्रमांकावर अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस असून त्यांची संपत्ती १९५ डॉलर अब्ज आहे. (फोटो – जेफ बेझोस/X)
-
मार्क झुकरबर्ग हे चौथ्या क्रमांकावर असून मेटाच्या माध्यमातून त्यांना १७७ डॉलर अब्ज निव्वळ संपत्ती कमावली आहे. (फोटो – मार्क झुकरबर्ग/X)
-
ओरकॅलचे सीईओ लॅरी एलिसन हे पाचव्या क्रमांकावर असून त्यांची संपत्ती १४१ डॉलर अब्ज आहे. (फोटो – लॅरी एलिसन/X)
-
बर्कशायर हॅथवेचे वॉरेन बफेट हे सहाव्या क्रमांकावर असून त्यांची संपत्ती १३३ डॉलर अब्ज आहे. (फोटो – वॉरेन बफेट/X)
-
मायक्रोसॉफ्टचे सीईओ बिल गेट्स हे सातव्या क्रमांकावर असून १२८ डॉलर अब्ज आहे. (फोटो – बिल गेट्स / X)
-
तर, स्टीव्ह बाल्मर यांची १२१ डॉलर अब्ज संपत्ती असून ते आठव्या क्रमाकांवर आहेत. (फोटो – स्टीव्ह बाल्मर / X)
-
भारतीय उद्योगपती रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे नवव्या क्रमांकावर असून त्यांची एकूण संपत्ती ११६ डॉलर अब्ज आहे. (फोटो – फोर्ब्स)
-
गुगलचे लॅरी पेज यांच्याकडे ११४ डॉलर अब्ज संपत्ती असून ते या यादीत दहाव्या क्रमांकावर आहेत. (फोटो – फोर्ब्स)
Devendra Fadnavis : ‘मी शिंदेंना सांगणार, कडक समज द्या, अन्यथा…’, संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून फडणवीसांचा मोठा इशारा