-
२०२४ च्या सुरुवातीला जगभरात बाबा वेंगा यांची सात भाकितं चर्चेत आली होती. तर आता नव्या वर्षातील तीन महिने सरल्यावर यातील काही भाकिते खरी सिद्ध झाल्याची चर्चा आहे
-
बल्गेरियातील नेत्रहीन वांगेलिया पांडवा गुश्तेरोवा उर्फ बाबा वंगा फकीर या एक जगप्रसिद्ध ज्योतिष होत्या. बाबा वेंगा यांचे १९९६ साली निधन झाले
-
लहानपणी वादळात आपली दृष्टी गमावलेल्या वेंगा यांनी वर्ष ५०७९ पर्यंत भविष्यवाणी करून ठेवल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे बाबा वेंगा यांची भविष्यवाणी कुठेही लिहिलेली नाही. बाबा वेंगा यांनी सांगितलेली भाकिते अनुयायांकडून सांगितली जातात
-
मिरर युकेच्या अहवालाच्या हवाल्याने आज तकने दिलेल्या माहितीनुसार बाबा वेंगा यांनी अशी भविष्यवाणी केली होती की २०२४ मध्ये जगात आर्थिक मंदीची लाट येईल. सध्याची परिस्थिती पाहता जपान व ब्रिटन ही दोन मुख्य राष्ट्रे सुद्धा आर्थिक संकटाला सामोरी जात आहेत
-
ऑफिस ऑफ नॅशनल स्टॅस्टिक्सद्वारे सुद्धा याची पुष्टी केली गेली आहे की ब्रिटनच्या जीडीपीमध्ये डिसेंबरपासून तीन महिन्यात अपेक्षेपेक्षा ०.३ टक्के अधिक पडझड पाहायला मिळाली आहे. तर जपानी चलनाची सुद्धा किंमत घसरत आहे. अमेरिकेन डॉलरच्या तुलनेत जपानच्या येनचा दर आता १५१.९७ पर्यंत पोहोचला आहे.
-
बाबा वेंगा यांची दुसरी खरी झालेली भविष्यवाणी मात्र आनंदाची वार्ता आहे. वैद्यकीय प्रगतीमुळे २०२४ मध्ये असाध्य रोगांवर नवीन उपचार उपलब्ध होतील असे वेंगा यांनी म्हटले होते. त्यानुसार फुफ्फुसांच्या कर्करोगावरील लसीवर सध्या वेगाने काम चालू आहे
-
सायबर हल्ल्यांमध्ये वाढ होईल, क्वांटम कंप्युटिंगमध्ये मोठी प्रगती होईल, युरोपला दहशतवादी हल्ल्यांना सामोरे जावे लागेल, पुतीन यांच्यावर हल्ला होईल अशीही अनेक भाकिते वेंगा यांनी २०२४ या वर्षासाठी केली आहेत त्यातील किती गोष्टी खऱ्या होतात हे आता काळच ठरवेल
-
२०२३ मध्ये सुद्धा त्यांनी जगात नैसर्गिक व मानवनिर्मित अनेक मोठ्या संकटाच्या घडामोडी घडतील असे भाकीत केले होते. मानवनिर्मित म्हणायची तर इस्त्रायल – पॅलेस्टाईन युद्धाच्या रूपात तर नैसर्गिक म्हणायचं ठिकठिकाणी आलेल्या पूर व भूकंपाच्या घटनांनी ही भाकितं काही प्रमाणात खरी झाल्याचे म्हटले जात होते.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)(सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन