-
साडे तीन मुहूर्तांपैकी एक… हिंदू नवर्षाचा शुभारंभ असलेल्या गुढीपाडवा सण मुंबईसह राज्यभरात मोठ्या उत्साहात पार पडला.
-
ढोल ताशांचा गजर, झांज अन् वेशीमच्या तालावर नटूनथटून पारंपारिक वेषात नववर्षांचे स्वागत करण्यात आले.
-
मिरवणुका, शोभायात्रांमधून एकतेचा संदेश देणाऱ्या गुढ्या मुंबईत दारोदारी उभारण्यात आल्या.
-
यंदाही मुंबईतील गिरगाव परिसरात शोभायात्रांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात, जल्लोषात नववर्षाचे स्वागत करण्यात आले.
-
या शोभायात्रांमध्ये अनेक महिला नऊवारी, पैठणी साड्या त्यावर दागिण्यांचा साज, डोक्यावर फेटा आणि पायात कोल्हापूर चप्पल अशा एकदम मराठमोळ्या पेहरावा सहभागी झाल्या होत्या,
-
दरम्यान यंदा हिंदू नववर्ष स्वागतयात्रेत अनेकांनी रामराज्य व शिवराज्य संकल्पनेवर आधारित वेषभूषा केल्याचे पाहायला मिळाले.
-
यासह मल्लखांब प्रदर्शन, पुणेरीसह विविध ढोल ताशा पथके, महिलांचे विशेष झांजपथक, विविध शोभायात्रा रथांचा सहभाग होता.
-
गिरगावच्या फडके गणेश मंदिरापासून शोभायात्रेला सुरुवात झाली. याठिकाणी २२ फुटांची गुढी उभारण्यात आली.
-
दरम्यान दरवर्षी प्रमाणे यंदाही शोभायात्रेतील मराठमोळ्या पेहरावातील महिलांची बुलेटस्वारी सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.
-
पारंपारिक मराठमोळा पेहराव करुन अनेक महिला बुलेट अन् काही आपल्याकडे असलेल्या विविध प्रकारच्या दुचाकी घेऊन शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या. (Express photo by Sankhadeep Banerjee)

“ती गरोदर आहे आणि…”, बापाने स्वत:च्याच मुलीशी केलं लग्न, धक्कादायक VIDEO होतोय व्हायरल