-
भारतीय बाजारपेठेत सात सीटर एसयुव्ही आणि एमपीव्ही गाड्यांना नेहमीच मोठी मागणी असते.
-
अलीकडच्या काळात ही मागणी फार वाढली असून त्यामुळे बाजारात सात सीटर कारची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे.
-
महिंद्रा स्कॉर्पिओ हे या सेगमेंटमधील एक प्रसिद्ध नाव आहे, परंतु एक अशी कार आहे जिचा दबदबा बाजारपेठेत कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत आणि ही कार वर्षभर तिच्या सेगमेंटमधील विक्रीच्या बाबतीत नंबर-वन राहिली आहे.
-
या कारची गेल्या महिन्यात १४,८८८ युनिट्स विकली गेली आणि तिची किंमत १० लाख रुपयांपेक्षा कमी आहे. ही कार कंपनीच्या अनेक स्वस्त कारपेक्षा चांगली कामगिरी करत आहे.
-
आम्ही ज्या सात-सीटर कारबद्दल बोलत आहोत ती मारुती सुझुकीची Ertiga MPV कार आहे, जी सात-सीटर MPV सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकली जाणारी कार आहे.
-
. मारुती सुझुकीची खिशाला परवडणारी सात सीटर एमपीव्ही Ertiga ही सध्याच्या घडीला देशात सर्वाधिक विक्री होणारी कार आहे.
-
गेल्या महिन्यात एर्टिगाच्या १४,८८८ युनिट्सची विक्री झाली होती, वार्षिक आधारावर या कारच्या विक्रीत ६५ टक्क्यांनी वाढ झाली, असल्याची माहिती आहे.
-
या कारची किंमत ८.६४ लाख रुपयांपासून सुरू होते. ही कार पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन इंजिन पर्यायांमध्ये येते. ही एक एमपीव्ही कार आहे.
-
यामध्ये १.५ लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन माईल्ड हायब्रिड टेक्नोलॉजीसह सुसज्ज आहे. यातलं इंजिन १०३PS पॉवर आणि १३७Nm टॉर्क आउटपुट देऊ शकतं. सीएनजीवर ही कार २६ किमीपर्यंतचं मायलेज देते. (फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”