-
संगणक, स्मार्टफोन, लॅपटॉप आदी डिव्हाइसवर आपली बरीच कामे अवलंबून असतात. पण, या डिव्हाइसवर काही शॉर्टकट कीजसुद्धा असतात, ज्या काम करताना आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
या शॉर्टकट कीज माहिती असतील तर काम आणखीन सोपे आणि जलद होण्यास मदत होते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तर आज आपण संगणक आणि लॅपटॉपवर काम करताना कोणत्या शॉर्टकीज वापरायच्या याची यादी पाहू. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
खास शॉर्टकट की आणि त्यांच्या वापर कसा करायचा याबद्दल सविस्तर जाणून घेऊया… (फोटो सौजन्य: @Freepik)
-
नवीन टॅब उघडण्यासाठी आपल्यापैकी बरेच जण दिवसातून अनेक वेळा माउसचा वापर करतात. पण, यासाठी तुम्ही माउसचा वापर न करता Ctrl + T हा शॉर्टकट वापरू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तुम्ही काम करत असताना चुकून एखादा महत्त्वाचा टॅब बंद झाला, तर तुम्ही ‘ Ctrl+ Shift + T ‘ कॉम्बो वापरून चुकून बंद झालेला टॅब पुन्हा ओपन करू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
‘Ctrl + N’ हा शॉर्टकट वापरा आणि नवीन विंडो ओपन करा. तुम्ही नवीन टॅब उघडता त्याप्रमाणे, टायपिंग कर्सर आपोआप ॲड्रेस बारवर फोकस करतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
काम करताना आपण एकापेक्षा अधिक टॅब उघडून ठेवतो. पण, या छोट्या छोट्या टॅबवर क्लिक करणे कठीण होऊन जाते. तर पुढील टॅबवर जाण्यासाठी ‘Ctrl + Tab’ शॉर्टकट दाबा किंवा मागच्या टॅबवर येण्यासाठी ‘Ctrl + Shift + Tab’ वापरा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तुम्हाला एखादी माहिती शोधायची आहे, पण तुमचा ब्राउझर त्याला प्रतिसाद देत नसेल तर Ctrl + Shift + N शॉर्टकट वापरा. तुमच्यासमोर एक गुप्त सर्च बार उघडेल, तिथे तुम्ही सर्च करा. (फोटो सौजन्य: @Freepik)

शनीदेव घेऊन आले सुखाचे दिवस; मकर राशीची साडेसाती संपताच ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंतीचे सुख लाभणार