-
ड्रायव्हिंग लायसन्स (वाहनचालक परवाना) मिळविणे हे सोपे काम नाही. या परवान्यासाठी लेखी परीक्षेपासून ते वाहन चालविण्याच्या चाचणीपर्यंत अनेक प्रक्रियांतून जावे लागते. (Photo: Freepik)
-
चाचणीसाठी आरटीओमध्ये तासन् तास लांब रांगेत उभे राहावे लागते. पण, आता या सर्व समस्यांपासून तुमची सुटका होणार आहे. कारण- रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय ड्रायव्हिंग लायसन्ससंबंधी नवीन नियम आणत आहे.(Photo: Freepik)
-
ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी सरकारने नियम बदलले आहेत. सरकारी प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) व्यक्तींना ड्रायव्हिंग चाचणी देण्याची गरज नाही.(Photo: Freepik)
-
त्याऐवजी खासगी संस्थांना आता चाचण्या घेण्यास आणि प्रमाणपत्र देण्यास अधिकृत करण्यात आले आहे की, ते प्रशिक्षणार्थींना ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकतात. हे नियम १ जून २०२४ पासून लागू होतील.(Photo: Freepik)
-
नवीन नियमांनुसार स्थळानुरूप ठरवून दिलेल्या वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगाने गाडी चालवल्यास हजार ते दोन हजार रुपये एवढा दंड असेल. (Photo: Freepik)
-
अल्पवयीन व्यक्ती वाहन चालविताना पकडली गेल्यास, त्यांना २५ हजार रुपये दंड भरावा लागेल. वाहनमालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केले जाईल आणि वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत अल्पवयीन मुलांना परवाना मिळू शकणार नाही.(Photo: Freepik)
-
खासगी दुचाकी वाहनचालक प्रशिक्षण केंद्राकडे किमान एक एकर जमीन असणे आवश्यक आहे. चारचाकी मोटार वाहनचालक प्रशिक्षण केंद्राकडे अतिरिक्त दोन एकर जमीन आवश्यक आहे.(Photo: Freepik)
-
वाहनचालकाच्या चाचणीसाठी आवश्यक त्या सुविधा खासगी वाहनचालक प्रशिक्षण केंद्राकडे असणे आवश्यक आहे.(Photo: Freepik)
-
प्रशिक्षकांसाठी पात्रता : प्रशिक्षकांकडे किमान हायस्कूल डिप्लोमा असणे आवश्यक आहे. त्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे किमान पाच वर्षांचा वाहन चालविण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. प्रशिक्षकांना बायोमेट्रिक्स आणि माहिती तंत्रज्ञान प्रणालीशी संबंधित मूलभूत गोष्टी परिचित असल्या पाहिजेत.(Photo: Freepik)
पिंपरी-चिंचवड अन् भोवतालच्या पाच किलोमीटर परिसरातील शेकडो गृहप्रकल्प अडचणीत