-
दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. यंदा १२ मेला मातृदिन साजरा केला जाणार आहे.
-
यंदाच्या ‘मदर्स डे’च्या निमित्ताने तुम्हालाही तुमच्या लाडक्या आईला एखादे गिफ्ट देण्याची इच्छा असेल. मात्र, त्याच-त्याच गोष्टी करून तुम्हीही बोर झाला आहात का?
-
तर आज आपण अशा काही गोष्टी पाहूया ज्यामुळे आईसाठी यंदाचा ‘मदर्स डे’ कायम लक्षात राहण्यास मदत होईल.
-
तुम्ही तुमच्या आईच्या नावे एखादी SIP चालू करू शकता. अगदी ५०० ते १००० रुपयांपासून अलीकडे SIP करण्याची मुभा आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःलाही फार खर्चात न टाकता हा पर्याय नक्कीच विचारात घेऊ शकता.
-
दर महिन्याला ठराविक रक्कम आपण आईच्या नावे या SIP मध्ये गुंतवून यावरील व्याज हे थेट तुमच्या आईच्या खात्यात जोडता येऊ शकते.
-
जर तुमच्या आईला सोने खरेदी करायला आवडत असेल तर तुम्ही आईसाठी गोल्ड बाँड किंवा गोल्ड फंडमध्ये गुंतवणूक करून आईची सोन्याची हौस नक्कीच पूर्ण करू शकते.
-
तुम्ही आईसाठी एखादी सरप्राइज पिकनिक प्लॅन करू शकतात. तुम्ही लहान असताना तुमचे आईबाबा तुम्हाला लहानशा पिकनिकला नक्कीच घेऊन गेले असतील. आता त्यांच्या उतार वयात तुम्ही तुमच्या आईला अशाच एका सुंदर पिकनिकला घेऊन जाऊ शकता आणि जुने दिवस आठवू शकता.
-
आणखी एक खास गोष्ट तुम्ही करू शकता. जर तुम्हाला बाइक चालवण्याची आवड असेल तर तुम्ही आईला एका खास बाइक राईडला घेऊन जाऊ शकता. सनसेट पॉइंटला जाऊन तुम्ही सूर्यास्ताचा आनंद घेऊ शकता.
-
आपल्या आईंना शॉपिंग करायला फार आवडते. यंदाच्या मदर्स डेला तुम्ही आईला शॉपिंगसाठी घेऊन जाऊ शकता. तुम्ही आईबरोबर खास स्ट्रीट शॉपिंग केली तर तुम्ही आईच्या मोलभावाचा अनुभव घेऊ शकता.
-
यंदाच्या मदर्स डेला तुम्ही आईला मस्त रोड ट्रीपला घेऊन जा. यावेळी तुम्ही गाडीमध्ये आईची आवडती गाणी लावू शकता. आईबरोबर छान गप्पा मारू शकता.
-
तुमच्या आईला तिच्या आवडत्या कपड्यांसह बाहेर घेऊन जा आणि तिचे फोटोशूट करा. यावेळी त्यांना पोज द्यायला मदत करा आणि खूप मजा करा.
-
आईसाठी तिचे जुने फोटो, जसे की त्यांचे मित्रमैत्रिणी, भावंड, कुटुंबीय यांबरोबरचे फोटो, व्हिडीओ एकत्र करून छानसा व्हिडीओ बनवून आईल दाखवल्यास आईला खूप आनंद होऊ शकतो.
-
तुम्ही आईबरोबर घरच्या घरी एक मुव्ही नाइट प्लॅन करू शकता. यावेळी त्यांच्या आवडीचे जेवण आणि इतर पदार्थ तुम्ही ऑर्डर करू शकता.
-
मदर्स डेला सकाळी आई उठण्याआधीच तुम्ही त्यांच्यासाठी खास नाश्ता तयार केल्यास त्यांना खूप आनंद होऊ शकतो. मात्र, नाश्ता तयार केल्यानंतर स्वयंपाकघर स्वच्छ करायला विसरू नका.
-
आई ही प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय प्रेमळ व्यक्ती असते. तिला महागड्या भेटवस्तूंपेक्षा मुलांचा सहवास अधिक प्रिय असतो. म्हणूनच यंदाच्या मदर्स डेला तुम्ही तुमच्या आईबरोबर वेळ घालवून त्यांचा खास दिवस आनंदमय करू शकता.
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच