-
आज अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सराफा बाजारामध्ये मोठी उलाढल असते. कोट्यवधी रुपयांची सोन्याची खरेदी-विक्री होते. पण तुम्हाला माहितीये का, भारतात सोन्याचे दर कसे ठरविले जातात? जुन्या दागिन्यांची किंमत कशी ठरवली जाते? (Photo: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
खरेदीदार म्हणून तुम्ही खरेदी केलेल्या दागिन्यांचे दर कसे ठरतात, हे जाणून घेणे आवश्यक आहे. चला तर आजच्या लेखात आपण याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.(Photo: Freepik)
-
दागिन्यांची किंमत शुद्धता, घडणावळ, सोन्याचे वजन आणि जीएसटी यांवर सोन्याची किंमत निश्चित केली जाते. गोल्ड असोसिएशनने ठरवून दिलेल्या दैनंदिन सोन्याच्या दरानुसार दररोज सकाळी सोने व्यापारी आणि किरकोळ विक्रेते काम करतात. (Photo: Freepik)
-
दागिन्यांची अंतिम किंमत = सोन्याची प्रति ग्रॅम किंमत (२२ कॅरेट किंवा १८ कॅरेट) X (ग्रॅममध्ये वजन) + मेकिंग चार्जेस/ ग्रॅम + वस्तू आणि सेवा कर (GST) शिवाय (दागिन्यांची किंमत + मेकिंग चार्जेस). अशाप्रकारे भारतात सोन्याची किंमत मोजली जाते. (Photo: Freepik)
-
सोन्याची शुद्धता कॅरेटमध्ये मोजली जाते. सोन्यामध्ये २४ कॅरेट हे सर्वात शुद्ध स्वरूप मानले जाते. तर २४ कॅरेट दागिने तयार करण्यासाठी उपयुक्त मानले जात नाही. (Photo: Freepik)
-
मेकिंग चार्जेस प्रत्येक ज्वेलर्सच्या दुकानात वेगवेगळे असतात. दागिन्यांची डिझाइन कशी आहे यावर ते अवलंबून असतात. (Photo: Freepik)
-
सोन्याची मागणी ही पुरवठा व इतर घटकांवर अवलंबून असते, तसेच दैनंदिन किमतीत चढ-उतार होत असतात. (Photo: Freepik)
-
जुन्या दागिन्यांची किंमत भारतात जुने दागिने वितळवल्यानंतर पुन्हा एकदा एक्सआरएफ मशीनद्वारे शुद्धता तपासली जाते. (Photo: Freepik)
-
तीन रीडिंग्ज घेतल्यानंतर सरासरी मूल्य जुन्या सोन्याची खरी शुद्धता मानली जाते, त्यानंतर वितळवलेल्या सोन्याचे पुन्हा एकदा वजन केले जाते. नवीन शुद्धता आणि वजनाच्या आधारे अंतिम किंमत ठरवली जाते.(Photo: Freepik)

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं