-
स्वस्तात, मस्त आणि आरामदायी प्रवासासाठी प्रवासी नेहमी भारतीय रेल्वेला प्राधान्य दिले जाते. मात्र अनेकदा कन्फर्म तिकीट न मिळाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होते.
-
विशेषत: सुट्टीच्या आणि सणासुदीच्या काळात ट्रेनमध्ये कन्फर्म सीट मिळणे फार अवघड असते.
-
अशा परिस्थितीत लोकांकडे तत्काळ तिकीट बुकिंगचा पर्याय उपलब्ध असतो. पण अनेकदा तत्काळमध्ये तिकीट बुक केल्यास तुम्हाला कन्फर्म सीट मिळेलच असे नाही.
-
अनेक वेळा तत्काळ तिकीट बुक करूनही कन्फर्म सीट मिळत नाही, असेही घडते. पण आम्ही तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहोत, ज्याने तुम्हाला ट्रेनचे कन्फर्म तिकीट मिळेल.
-
तुम्हाला ट्रेनच्या प्रवासाच्या तारखेच्या १ दिवस आधी तत्काळ तिकीट बुक करावे लागते.
-
परंतु प्रवाशांची मागणी जास्त असल्याने झटपट बुकिंग करणे खूपच कठीण होऊन बसते
-
यात लोकांची तक्रार आहे की, सर्व सामान्य लोकांऐवजी सर्व तत्काळ तिकिटे ही पटकन एजंटकडून बुक केली जातात.
-
पण रेल्वेने आता ट्रेनमध्ये एकही सीट रिकामी राहू नये आणि प्रत्येकाला कन्फर्म तिकीट मिळावे यासाठी करंट तिकीट बुकिंगचा एक पर्याय दिला आहे.
-
यामध्ये तुम्ही ट्रेन सुटण्याच्या चार तास ते पाच मिनिटांपूर्वी तिकीट बुक करू शकता.
-
करंट तिकीट बुकिंग पर्यायामधील एक चांगली गोष्ट म्हणजे तत्काळ किंवा प्रीमियम तत्काळच्या विपरीत, प्रवाशांना कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागत नाही.
-
तत्काळ तिकिटाच्या तुलनेत करंट तिकीट बुकिंगमधून तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळणे सोपे झाले आहे. उपलब्धतेनुसार, तुम्हाला यामध्ये कन्फर्म तिकिटे सहज मिळू शकते.
“जाण्याची वेळ झाली…”, अमिताभ बच्चन यांची पोस्ट