-
प्रत्येकाच्या घरी बिस्कीट सहज उपलब्ध असते. बिस्किट खाणं कुणालाही आवडतं.
-
सकाळची सुरुवात दुधाचा चहा आणि बिस्किटांनी करणारे अनेक जण आहेत. लहान मुलांसाठी तर बिस्किट जेवणच असतं.
-
सकाळ असो वा संध्याकाळ, दिवस असो वा रात्र, लोकांना बिस्किटं खायला खूप आवडतं.
-
बाजारात बिस्किटांचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. या बिस्किटांचं डिझाइनसुद्धा वेगवेगळं असतं.
-
तुम्ही बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक बिस्किटांना लहान छिद्र असल्याचे पाहिले असेल, हे छिद्र कमीअधीक प्रमाणात असतात.
-
पण तुम्ही कधी विचार केला आहे का बिस्किटांमध्ये असे लहान छिद्र का असतात? बहुतेक लोकांना वाटते की, बिस्किटांना आकर्षक बनविण्यासाठी छिद्रे केली असणार.
-
खरंतर ही कोणती डिझाईन नाही तर यामागे वैज्ञानिक कारण दडलेलं आहे. हे कारण नेमकं कोणते ते जाणून घेऊया..
-
खरेतर बिस्किटांना असलेल्या छिद्रांना ‘डाकर्स’ म्हणतात.
-
बिस्किट भाजले जात असताना त्यात हवा भरली जाते. त्यामुळे बिस्किटांचा आकार खराब होण्याची शक्यता असते.
-
बिस्किटांमधून ही हवा बाहेर पडावी म्हणून बिस्किटांना लहान छिद्र केली जातात.
-
कारण छिद्र नसतील तर पिठाच्या आत हवा तशीच राहते. त्यामुळे ओव्हनमध्ये बिस्किटं बनवत असताना ती फुगतात, व त्यांचा आकार वाढू लागतो. आकार वाढू नये, म्हणून छिद्र केली जातात.
-
बिस्किटे बनवण्यासाठी कारखान्यांमध्ये इतकी हायटेक मशिन्स वापरली जातात की त्या बिस्किटांना समान अंतरावर छिद्र पाडतात. म्हणून ते डिझाइन सारखं वाटतात. (फोटो सौजन्य : freepik)

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य