-
भारतात इलेक्ट्रिक स्कूटर्सची खरीदी वाढत आहे. या इलेक्ट्रिक स्कूटर्स लोकांसाठी महागड्या पेट्रोलवर पैसे वाचवण्याचा एक चांगला मार्ग बनत आहे. जाणून घेऊया अशा काही इलेक्ट्रिक स्कूटर्सचे पर्याय ज्या सर्व किंमत 1 लाख रुपयांपेक्षा कमी आहेत. -
ओला इलेक्ट्रिकची नवीन स्कूटर्स ‘Ola S1 X’ही इलेक्ट्रिक स्कूटर एक लाखापेक्षा कमी बजेटमध्ये ३ बॅटरी पर्यायांसह उपलब्ध आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत ६९,९९९ रुपये आहे, याचे ‘3kW’ बॅटरी व्हेरिएंटची किंमत ८४,९९९ रुपये आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर ९१ किमी ते १९० किमीची रेंज देण्यास सक्षम आहे. (फोटो – ओला) -
एक लाख बजेटमध्ये असणारा दूसरा इलेक्ट्रिक स्कूटरच्या पर्याय म्हणजे ‘TVS iQube’. ही इलेक्ट्रिक स्कूटर ९४,९९९ 94.99 रुपयांच्या किमतीत खरेदी केली जाऊ शकते. यामध्ये ‘3.04kWh’ क्षमतेची बॅटरी आहे जी एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ७५ किमीची रेंज देते. (फोटो – TVS) -
‘Okinawa Ridge Plus’ ही इलेक्ट्रिक स्कूटर तुम्ही ८४,००० रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक स्कूटर तुम्हाला ८१ किमीची रेंज देण्यास सक्षम आहे. (फोटो – ओकिनावा) -
‘Ampere Zeal EX’ ही इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात ९६,६९० रुपयांच्या किमतीत खरेदी करता येईल. यामध्ये ‘2.2 kWh’ क्षमतेची बॅटरी आहे. ही स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर १२० किमीची रेंज देण्यास सक्षम आहे. (फोटो-अँपिअर इलेक्ट्रिक) -
‘Hero Electric Atria LX’ हिरो कंपनीची सर्वोत्तम इलेक्ट्रिक स्कूटर जी तुम्ही ७७,६९० रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे. पूर्ण चार्ज केल्यावर ही स्कूटर ८५ किमीची रेंज देण्यास सक्षम आहे. (फोटो – हिरो इलेक्ट्रिक)

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…