-
चोरी होऊ नये म्हणून पेटी, दरवाजा, कपाट वा तिजोरी यांच्यासाठी जितकी कुलूप अन् किल्लीची आवश्यकता असते. तितकीच आजच्या डिजिटल युगात पासवर्डची आवश्यकता असते.
-
आज प्रत्येक जण आपल्या ‘प्रायव्हसी’ला प्राधान्य देताना दिसून येतो. मग तो अगदी साधा फोन असो किंवा अॅण्ड्रॉईड स्मार्टफोन; संवादाची देवाणघेवाण करणाऱ्या या फोनसाठी आपण आपसूकच उपलब्ध होणाऱ्या पासवर्डचा पर्याय वापरतो.
-
या पासवर्डमुळे आपल्या स्मार्टफोनमध्ये सहजपणे कोणी डोकावू शकत नाही अथवा त्यामधील इतर माहितीही आपण स्वत: तो उघडून दिल्याशिवाय कुणालाही पाहता येत नाही. म्हणजे हा पासवर्ड आपल्या स्मार्टफोनसाठी एक प्रकारे आपल्या वैयक्तिक पहारेकऱ्याचे काम करतो.
-
समाजमाध्यमापासून ते ऑनलाइन बँकिंगपर्यंत सर्वच ठिकाणी हा पासवर्ड आवश्यक असतो.
-
सध्याच्या काळात सगळे लोक आपल्या कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल, टॅबलेट आणि पैसे ठेवण्याच्या लॉकरसाठीही पासवर्ड सेट करतात.
-
जवळजवळ प्रत्येक ऑनलाइन सेवा किंवा प्लॅटफॉर्मच्या सुरक्षा प्रोटोकॉलला आधार देणारा पासवर्ड हा डिजिटल जीवनाचा अविभाज्य भाग आहे, असेच म्हणावे लागेल.
-
एकंदरीत पासवर्ड हा शब्द असा आहे की, त्याचा आपण दैनंदिन जीवनात सातत्याने वापर करतो. पण, असे असले तरी पासवर्ड हा तर इंग्रजी शब्द आहे.
-
मग पासवर्डला मराठीत काय म्हणतात? तुम्हाला माहीत आहे का? फार कमी लोकांना हा मराठी शब्द ठाऊक असेल?
-
पण, आम्ही तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देणार आहोत. तर मंडळी, पासवर्डला मराठीत ‘सांकेतिक शब्द’, असं म्हणतात. (फोटो सौजन्य : freepik)

दुबईतील वाळवंटात पोहोचलेल्या मराठी अभिनेत्रीला ओळखलं का?