-
तुम्ही रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर अनेकदा पाहत असाल की, अनेक लोक त्यांच्या कुटुंबियांना, मित्रांना रेल्वे स्टेशनवर सोडायला येत असतात.
-
अनेकदा काही प्रवासी एकटे प्रवास करतात अशावेळी त्यांच्याकडील सामान उचलण्यास मदत करण्यासाठी ते कुटुंबातील सदस्याला रेल्वे स्टेशनवर बोलवतात.
-
पण ट्रेनने प्रवास करण्यासाठी नाही पण कोणालातरी मदत करण्यासाठी म्हणून रेल्वे स्टेशनवर जात असाल तर अशावेळी तुमच्याकडे प्लॅटफॉर्म तिकीट आवश्यक असते.
-
स्टेशनवर कोणाची वाट पाहत थांबण्यासाठीही प्लॅटफॉर्म तिकीटची गरज असते.
-
प्लॅटफॉर्म तिकीटाच्या किमतीबद्दल बोलायचे झाल्यास ते १० रुपये आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते ऑनलाइन खरेदी करू शकता किंवा रेल्वे स्टेशनवर जाऊन तुम्ही तिकीट काउंटरवरुन ऑफलाइन काढू शकता.
-
रेल्वेच्या अधिकृत UTS ॲपद्वारे ऑनलाइन प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करता येते. पण तुम्हाला माहीत आहे का एका प्लॅटफॉर्म तिकिटावर तु्म्ही किती तास स्टेशनवर थांबू शकता?
-
एखादी व्यक्ती प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी केल्यानंतर २ तास थांबू शकते.
-
प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी केल्यानंतर २ तासांपेक्षा जास्त तास रेल्वे स्टेशनवर थांबलात तर तुमच्याकडून २५० रुपये दंड आकारला जाऊ शकतो.
-
या दंडाबरोबरच तुमच्याकडून जवळच्या रेल्वे स्थानकापर्यंतचे भाडेही आकारले जाऊ शकते.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”