-
युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने मोफत आधार कार्ड ऑनलाइन अपडेट करण्याची अंतिम मुदत १४ जून २०२४ पर्यंत वाढवली आहे. जर तुम्हाला तुमचे आधार कार्ड ऑनलाइन अपडेट करायचे असेल तर पुढील स्टेप्स तुम्ही फॉलो करा… (फोटो सौजन्य: Indian Express )
-
१. UIDAI वेबसाइटवर जा – युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या uidai.gov.in च्या वेबसाइटला भेट द्या. तुमची भाषा निवडा. (फोटो सौजन्य: Indian Express)
-
२. माय आधार टॅबवर क्लिक करा आणि ड्रॉपडाउन मेनूमधून ‘तुमचा आधार अपडेट करा’ हा पर्याय निवडा. (फोटो सौजन्य: Indian Express )
-
३. पर्याय निवडल्यानंतर तुमच्या समोर ‘अपडेट आधार डिटेल्स ऑनलाइन’ हे पेज दिसेल. त्यानंतर डॉक्युमेंट अपडेटवर क्लिक करा. (फोटो सौजन्य: Indian Express)
-
४. नंतर तुमचा UID क्रमांक आणि कॅप्चा कोड एंटर करा. त्यानंतर तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर टाका. पासवर्ड प्राप्त करण्यासाठी ‘ओटीपी पाठवा’वर क्लिक करा. (फोटो सौजन्य: Indian Express )
-
५. OTP आल्यानंतर तो तेथे टाका आणि लॉग इन वर क्लिक करा. (फोटो सौजन्य: Indian Express)
-
६. तुम्हाला अपडेट करायचे असलेले (नाव, पत्ता, जन्मतारीख इ.) पर्याय निवडा आणि नवीन माहिती अचूक भरा. (फोटो सौजन्य: Indian Express)
-
७. सबमिट करा आणि डॉक्युमेंट अपलोड करा – एकदा तुम्ही आवश्यक बदल केल्यानंतर, सबमिट करावर क्लिक करा आणि आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा. (फोटो सौजन्य: financial express )
-
८. सबमिट अपडेट रिक्वेस्टवर क्लिक करा. तुमच्या विनंतीच्या स्थितीचा मागोवा घेण्यासाठी तुम्हाला एसएमएसद्वारे अपडेट विनंती क्रमांक (URN) प्राप्त होईल.लॅाग इन केल्यानंतर आधारकार्डाची संपूर्ण माहिती तुमच्यासमोर असेल. (फोटो सौजन्य: Indian Express )

शनीदेव घेऊन आले सुखाचे दिवस; मकर राशीची साडेसाती संपताच ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंतीचे सुख लाभणार