-
ऑफिस, कॉलेज किंवा इतर ठिकाणी वेळेत आणि अगदी कमी खर्चात जाण्यासाठी आपण सगळेच ट्रेन हा पर्याय निवडतो. पण, एखाद्या ठिकाणी वेळेत पोहचायचं असेल आणि तिकीट काढली नसेल तर मात्र तिकीट काउंटवर जाऊन तिकीट काढावी लागते. (फोटो सौजन्य: @express photo )
-
तर हा वेळ वाचवण्यासाठी तुम्ही घरातून निघायच्या आधीच युटीएस (UTS) ॲपवरून तुम्ही तुमचे तिकीट बुक करू शकता. तिकीट बुक कारण्यासाठी तुम्ही पुढील स्टेप्स फॉलो करू शकता. (फोटो सौजन्य: @express photo / Ganesh Shirsekar)
-
तुमच्या मोबाईलमधील युटीएस (UTS) ॲप ओपन करा. (फोटो सौजन्य: @express photo)
-
तुमच्या वैयक्तिक माहितीसह ॲप लॉग इन (Log In) करा. (फोटो सौजन्य: @express photo
-
त्यानंतर मेन्यूमधून ‘प्लॅटफॉर्म बुकिंग’ (Platform Booking) हा पर्याय निवडा. . (फोटो सौजन्य: @लोकसत्ता डॉट कॉम )
-
नंतर पेपरलेस तिकीट (Paperless Ticket) हा पर्याय निवडा.(फोटो सौजन्य: @express photo )
-
तुमच्या सोयीनुसार पेमेंट पद्धत निवडा, जसे की UTS वॉलेट किंवा इतर उपलब्ध पर्याय आणि पेमेंट करून घ्या. (फोटो सौजन्य: @लोकसत्ता डॉट कॉम )
-
नंतर तुम्हाला जेथे जायचं आहे त्या स्टेशनचे नाव, किती जणांसाठी तिकीट काढायची आहे, जनरल की रिटर्न तिकीट हे सर्व पर्याय तुमच्या सोयीनुसार निवडून proceed बटनावर क्लिक करा. (फोटो सौजन्य: Express File / Amit Chakravarty)
-
तुमचे पेमेंट करून झाल्यावर तुमच्या स्क्रिनवर तुम्हाला तिकीट दिसेल. अशाप्रकारे तुम्ही काही सेकेंदात तुमचे तिकीट बुक करू शकता. (फोटो सौजन्य: Express photo / Deepak Joshi )
US Illegal Immigrants: भारतीय नागरिकांना साखळदंड बांधून अमेरिकेतून पाठवलं? व्हायरल फोटोमागचं सत्य काय?