-
टाळ चिपळ्यांच्या संग.. विठूनामात दंग होण्याची, विठुरायाच्या गजरात महाराष्ट्र दुमदुमण्याची वेळ आता जवळ आली आहे. (Express photo by Sankhadeep Banerjee. 17.06.2024.)
-
यंदा १७ जुलैला आषाढी एकादशी साजरी होणार असून त्यासाठी महाराष्ट्रभरातून पालखी सोहळे आरंभले जात आहेत.(Express photo by Sankhadeep Banerjee. 17.06.2024.)
-
मुंबईचे निशाण असलेल्या गेट वे ऑफ इंडिया येथून आज संत रोहिदास मंडळ व पांडुरंग प्रतिष्ठानातुन वारकरी दिंडीला निघाले. (Express photo by Sankhadeep Banerjee. 17.06.2024.)
-
आज १७ जून पासून संपूर्ण एक महिना प्रवास करून १७ जुलैला विठुरायाच्या चरणी हे वारकरी पोहोचणार आहेत. (Express photo by Sankhadeep Banerjee. 17.06.2024.)
-
देवशयनी एकादशीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. यादिवसापासून पुढील चार महिने भगवान विष्णू हे विश्रांती घेत असल्याचे सांगितले जाते. (Express photo by Sankhadeep Banerjee. 17.06.2024.)
-
या चातुर्मासात शक्यतो शुभ कार्य टाळली जातात. चार महिन्यांनी कार्तिकी एकादशीला देवउठनी एकादशी साजरी होते व त्यानंतर शुभ कार्य पुन्हा आरंभले जातात. (Express photo by Sankhadeep Banerjee. 17.06.2024.)
-
यंदा मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केलेल्या निर्णयानुसार यंदा आषाढीच्या शासकीय महापूजेस १० मानाच्या पालखी प्रमुखांना निमंत्रण दिलं जाणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत पालखी प्रमुखांनाही महापूजेचा मान मिळणार आहे. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तसेच यंदा शासनाने पालखी सोहळ्यातील १५०० दिंड्यांना २० हजार रुपये अनुदान देण्याच्या निर्णय घेतला आहे. या निर्णयाचं वारकरी सांप्रदायाकडून स्वागत करण्यात आलं आहे. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने संवर्धन आणि सुशोभिकरणाचे काम सुरू असल्याने १५ मार्चपासून पदस्पर्श दर्शन बंद होते. आता २ जूनला पुन्हा दर्शन सुरु केल्यानंतर रोजच पंढरपूरच्या मंदिर परिसर गजबजलेला दिसत होता. आता आषाढीच्या निमित्ताने तर पंढरपुरी भाविकांचा मेळा सजणार आहे. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

आता ऑफिसमध्ये पाणी पिण्याची पण भीती! पाहा Viral Video तील किळसवाणी घटना