-
नागपूरच्या डॉली चायवालाची आता भारतातच नाही तर जगभरात तुफान फॅन फॉलोविंग तयार झाली आहे. रोज त्याचे अनेक नवे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
-
काही महिन्यांपूर्वी तर खुद्द बिल गेट्स डॉलीने बनवलेला चहा प्यायले होते. यासंबंधीचा व्हिडीओ त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरही शेअर केला होता.
-
चहा बनविणाऱ्या डॉलीची विशेष आणि आगळीवेगळी ‘स्टाईल’ पाहून त्याला हैदराबादच्या मायक्रोसॉफ्टच्या ऑफिसमध्ये खास बिल गेट्ससाठी चहा बनविण्यासाठी बोलावून घेण्यात आले होते.
-
तसेच, ऑफिसमध्येच त्याच्यासाठी चहा टपरीची सर्व तयारी करून देण्यात आली होती. त्यानंतर डॉलीने बनविलेल्या चहाचा बिल गेट्सने आस्वाद घेतल्याचा व्हिडीओ आपण सर्वांनीच पाहिला आहे.
-
दरम्यान, डॉलीने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेला नवा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. यांचे कारणही अतिशय खास आहे.
-
यावेळी डॉली चक्क मालदीवच्या समुद्रकिनारी चहा बनवताना दिसत आहे. तर पर्यटक त्याच्या चहाचा आस्वाद घेत आहेत.
-
डॉली त्याच्या अनोख्या शैलीत चहा बनवताना दिसत असून त्याच्या मागे निळाशार स्वच्छ असा शांत समुद्रकिनारा दिसत आहे.
-
डॉलीने चहा बनवल्यानंतर स्वत:च्या हाताने चहा त्या परदेशी पर्यटकांना दिला आणि त्यांच्यासोबत फोटो काढले.
-
डॉलीचा हा नवा व्हिडीओ त्याच्या @dolly_ki_tapri_nagpur या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे, ज्यावर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
-
डॉली चहावाला गेल्या १५ ते २० वर्षांपासून चहा तयार करून विकण्याच्या त्याच्या आगळ्या वेगळ्या पद्धतीमुळे इंटरनेटवर चर्चेत होता. त्याच्या इंस्टाग्राम बायोमध्ये म्हटले आहे की, तो महाराष्ट्रातील नागपूर येथील “प्रसिद्ध” चहा-विक्रेता आहे.
-
डॉलीचे इन्स्टाग्रामवर 3 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. चहा देण्याच्या त्याच्या वेगळ्या शैलीसह त्याचा पोशाख देखील सर्वांचे लक्ष वेधून घेतो.
-
डॉलीचा चहाचा स्टॉल नेहमीच चहाप्रेमींनी गजबजलेला असतो. डॉलीच्या शैलीमुळे सोशल मीडिया वापरकर्ते त्याला ‘जॅक स्पॅरो ऑफ इंडिया’ म्हणूनही ओळखतात.
-
दरम्यान, डॉलीच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत म्हणजे त्याच्या चहाच्या दुकानातून होणारी विक्री. तो दररोज सुमारे ३५० ते ५०० कप चहा विकतो. त्याच्या चहाच्या एका कपची किंमत सात रुपये असून त्याची प्रतिदिन २५०० ते ३५०० पर्यंत कमाई होते.
-
डॉली चायवालाच्या खऱ्या संपत्तीबद्दल कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. तथापि, मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती १० लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे.
-
पण त्याच्या वाढत्या लोकप्रियतेसोबतच कमाईचे इतर मार्गही खुले होत आहेत. अनेक वेळा त्यांना प्रायोजकत्व मिळते किंवा उत्पादनाच्या जाहिरातीसाठी बोलावले जाते. अशा प्रसंगीही तो चांगले पैसे कमावतो.

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी