-
भारताच्या दळणवळणामध्ये रेल्वेचा मोठा वाटा आहे. भारतात कोट्यावधी लोक रेल्वेने प्रवास करतात. भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नेटवर्क असून भारताच्या कानाकोपऱ्यात रेल्वेचं जाळ विखुरलेलं आहे.
-
प्रवाशांना रेल्वेनं प्रवास करणं सुरक्षित, सोईचं व परवडणारं वाटतं. त्यामुळेच भारतातील जास्तीत जास्त लोक रेल्वेने प्रवास करणं पसंत करतात.
-
कमी अंतराच्या प्रवासासाठी लोक साधारणपणे जनरल डब्यातून प्रवास करणे पसंत करतात. या डब्यातून प्रवास करण्यासाठी अडव्हान्स बुकिंगची गरज नसते.
-
रेल्वेमधून प्रवास करताना तुमच्या लक्षात आले असेल की, ट्रेनचे डबे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जसे फर्स्ट एसी, सेकंड एसी, थर्ड एसी, स्लीपर आणि जनरल डबे आहेत.
-
रेल्वे कोणतीही असो, तिच्या सुरुवातीला किंवा शेवटीच जनरल डबे जोडण्यात येतात; तसेच एसी आणि स्लीपर कोच रेल्वेच्या मध्यभागी लावले असतात.
-
पण तुमच्या लक्षात आले आहे का की, प्रवाशांच्या सोयीसाठी एसी आणि स्लीपर कोचमध्ये दोन दरवाजे देण्यात आले आहेत तर जनरल डब्यांना तीन दरवाजे दिले असतात. पण याचं कारण काय, चला तर जाणून घेऊया…
-
याचे सर्वात मोठे कारण म्हणजे, बहुतेक जनरल डब्यांमध्ये सीट क्षमतेपेक्षा जास्त लोक बसतात. लांब पल्ल्याच्या गाड्यांचे जनरल डबे खचाखच भरलेले असतात. त्यात मोठी गर्दी असते. वर-खाली करताना लोकांना धक्काबुक्कीचा सामना करावा लागतो.
-
या लोकांच्या गर्दीमुळेच जनरल डब्यात तीन दरवाजे दिले असतात. अन्यथा दोन दरवाजे असल्यास अनेक प्रवाशांना जनरलमध्ये जाणेच अवघड होऊन बसते आणि आपत्कालीन परिस्थितीत अडचणी वाढू शकतात, अशी माहिती आहे.
-
स्लीपर आणि एसी कोचबद्दल बोलायचे झाले तर, या दोन्ही डब्यांमध्ये फक्त आरक्षण असलेले प्रवासी प्रवेश करतात. त्यामुळेच त्यात जास्त धक्के बसत नाहीत आणि जेवढे प्रवासी जागा आहेत तेवढेच प्रवासी असतात. त्यामुळे त्याला दोन दरवाजे दिले असल्याची माहिती आहे. (फोटो सौजन्य : indian express)
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच