-
उद्योगपती एलॉन मस्क हे कायमच विविध चर्चेत असतात. ट्वीटरचे नाव बदलणे असो किंवा लोगो बदलणे मस्क यांच्या नावाभोवती गेल्या २ वर्षात आणि सातत्याने अनेक घडामोडी घडल्या आहेत. (Photo-Indian Express)
-
आता त्यांच्या वैयक्तिक जीवनातील घडामोडींमुळे मस्क पुन्हा माध्यमांच्या पटलावर आले आहेत. मस्क हे बाराव्यांदा बाबा झाले आहेत. ४ दिवसांपूर्वी ही बातमी एनडीटीव्हीने दिली आहे. मस्क यांच्या बाराव्यांदा बाबा होणाऱ्या बातमीनंतर लोकांमध्ये मस्क यांच्या वैयक्तिक जीवनाबाबत जाणून घेण्याची ओढ अधिक प्रमाणात वाढली आहे. त्यांना किती पत्नी आहेत? मस्क पहिल्यांदा कधी बाबा झाले? तसेच त्यांच्या मुलांची नावं काय आहेत? याबाबत आता लोकांची उत्सुकता ताणली आहे. चला तर मग याबाबत माहिती जाणून घेऊ. (Photo-Indian Express)
-
एलॉन मस्क यांच्या आतापर्यंत अनेक जोडीदार राहिल्या आहेत. २००० सालापासून ते विविध महिलांशी नात्यात राहिले आणि विभक्तही झाले आहेत. एका महिला जोडीदाराशी तर त्यांचे दोनदा लग्न आणि दोनदा घटस्फोट झाला आहे.आतापर्यंत मस्क यांच्या चार पत्नी झाल्या आहेत. याआधी तिघींशी त्यांनी घटस्फोट घेतले आहेत, आता ते चौथ्या पत्नीबरोबर राहत आहेत. शिवोन झिलीस, मस्क यांच्या चौथ्या पत्नीचे नाव असून त्या एलॉन मस्क यांच्याच मालकीच्या न्यूरालिंक या ब्रेन ट्रान्स्प्लांट कंपनीच्या कार्याधिकारी आहेत. (Photo- Twitter/Elon Musk)
-
पहिली पत्नी आणि मुले
२००० सालात मस्क यांचा पहिला विवाह विल्सन यांच्याशी झाला होता. मस्क व विल्सन यांना ५ मुलं झाली. मस्क यांना झालेलं पहिलं बाळ १० आठवड्यांतच निधन पावलं. त्यांनी बाळाचे नाव नेवेदा ठेवले होते. त्यानंतर विल्सन आणि मस्क यांच्या घरी २००४ मध्ये ग्रिफिन आणि विवियन ही २ जुळी मुलं जन्माला आली. (Photo- Reuters) -
त्यानंतर विल्सन यांनी २००६ साली आयव्हीएफच्या मदतीने एकाचवेळी तीन मुलांना जन्म दिला. kai, Saxon आणि Damian अशी त्यांची नावं आहेत. २००८ साली विल्सन आणि मस्क यांनी घटस्फोट घेतला. (Photo- Twitter/Elon Musk)
-
दुसरी पत्नी आणि मुले
विल्सनशी घटस्फोटानंतर मस्क यांनी तलूलाह रिले यांच्याशी लग्न केले. २०१२ साली घटस्फोट घेऊन पुन्हा २०१३ साली विवाह केला. त्यानंतर ३ वर्षानंतर २०१६ मध्ये पुन्हा एलॉन व तलूलाह विभक्त झाले. मस्क यांना रिले यांच्यापासून कोणतेही मूल झाले नाही. -
तिसरी पत्नी आणि मुले
यापुढचे जीवन मस्क यांनी ग्राईम्स या सहचारिणीसह जगायला सुरु केले. ग्राईम्स यांच्यापासून २०२० मध्ये एक मुलगा झाला. एक्स (मुलाचे नाव) अशा स्वरूपाचे त्याचे नाव ठेवण्यात आले. त्यानंतर सरोगसीद्वारे २०२१ मध्ये त्यांना एक मुलगी झाली. तिचे Exa Dark Siderael असे नाव ठेवले. त्यानंतर मस्क यांनी ग्राईम्सपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला, परंतु ते विभक्त झाल्यांनतर त्यांना कळलं की त्यांना ग्राईम्सपासून आणखी एक मूल झाले आहे. त्यानंतर त्याचे नाव त्यांनी टेक्नो ठेवले. याशिवाय शिवोन झिलीस यांच्यापासून झालेल्या तिसऱ्या मुलाच्या काही दिवस आधीच ग्राईम यांनाही चौथं मूल झालं आहे. (Photo-Indian Express) -
चौथी पत्नी आणि मुले
२०२१ मध्येच शिवोन झिलीस या त्यांच्या चौथ्या पत्नीपासून त्यांना जुळी मुलं झाली, स्ट्रायडर आणि अझ्यूर अशी त्यांची नावे ठेवण्यात आली. यानंतर आता २०२४ मध्ये ते बाराव्यांदा बाबा झाले आहेत. शिवोनपासूनच झालेल्या या बाळाचे नाव आणि मुलगा की मुलगी हे कळू आतापर्यंत कळू शकलेले नाही. (Photo-Indian Express) -
बाराव्यांदा बाप होणारे मस्क हे सामाजिक जीवनात घटत्या जन्मदराबाबत चिंता व्यक्त करणारे गृहस्थ आहेत. त्यांनी एका सोशल पोस्टमधून याबाबत भाष्यही केलेलं आहे. ते म्हणाले होते “आत्तापर्यंत मानवी समाजाने सामना केलेल्या संकटांपैकी सर्वात भयंकर संकट म्हणजे वेगाने घटणारा जन्मदर आहे” (Photo- Reuters) (हेही पहा- PHOTOS : मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जूंवर जादूटोणा केल्याप्रकरणी त्यांच्याच मंत्र्याला अटक! वाचा माहिती)
![laxmi in hospital](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/laxmi-in-hospital-1.jpg?w=300&h=200&crop=1)
पोटच्या मुलाला वाचवण्यासाठी आईनं केले थेट आगीशी दोन हात; आता मृत्यूशीही झुंज सुरू!