-
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्न समारंभाला दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. अशातच काल म्हणजेच २ जुलै रोजी अंबानी कुटुंबाने समाजातील वंचित घटकांसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते.
-
नवी मुंबई येथील रिलायन्स कॉर्पोरेट पार्कमध्ये पालघर परिसरातील ५० जोडपी मोठ्या थाटामाटात आणि पारंपरिक पद्धतीने लग्नबंधनात अडकली आहेत.
-
या सामुहिक विवाह कार्यक्रमाला मुकेश अंबानी, नीता अंबानी, आकाश अंबानी, श्लोका अंबानी, ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्यासह संपूर्ण कुटुंब उपस्थित होते.
-
वधू-वरांचे कुटुंबीय, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते यांसारखे ८०० हून अधिक लोक या सामूहिक विवाहाला उपस्थित होते. समारंभानंतर पाहुण्यांसाठी भव्य भोजनाचे आयोजनही करण्यात आले होते.
-
या सामुहिक विवाहानंतर स्थानिक वारली जमातीने उपस्थित पाहुण्यांसाठी पारंपारिक तारपा नृत्य सादर केले आणि या कार्यक्रमाचे लौकिक आणखीनच वाढवले.
-
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीच्या सेलिब्रेशनचा एक भाग म्हणून अंबानी कुटुंबियांनी वंचितांच्या सामूहिक विवाहाचे आयोजन केले होते.
-
वधू आणि वर यांना सदिच्छा म्हणून अंबानी कुटुंबाने प्रत्येक जोडप्याला सोन्याचे दागिने, मंगळसूत्र, लग्नाच्या अंगठ्या, नथ, जोडवी आणि पैंजण यांसारखे चांदीचे दागिनेही दिले.
-
इतकंच नाही तर, अंबानी कुटुंबियांनी प्रत्येक जोडप्याला एका वर्षासाठी पुरेसा किराणा सामान आणि घरगुती वस्तू भेट दिल्या. यामध्ये ३६ जीवनावश्यक वस्तू, भांडी, गॅस स्टोव्ह, मिक्सर आणि पंखे यांसारखी उपकरणे आणि गादी, उशा यांचा समावेश आहे.
-
यात आणखी खास भेट म्हणून प्रत्येक वधूला तिचे ‘स्त्रीधन’ म्हणून १.०१ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. (सर्व फोटो : ANI)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”