-
जगन्नाथ रथयात्रा सुरू झाली असून सनातन धर्मात या यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
-
ओरिसातील पुरीमध्ये भगवान जगन्नाथाची ही रथयात्रा सुरू असून दरवर्षीप्रमाणे यंदाही जगन्नाथ रथयात्रेत भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.
-
असे म्हणतात की एकदा बहीण सुभद्राने तिचे भाऊ कृष्ण आणि बलराम यांना सांगितले की तिला शहर पाहायचे आहे. यानंतर, आपल्या बहिणीची इच्छा पूर्ण करण्यासाठी, दोन्ही भावांनी तीन रथ तयार केले.
-
त्यावर स्वार होऊन तिघे भाऊ-बहीण शहराच्या फेरफटका मारण्यासाठी निघाले आणि दौरा पूर्ण करून पुरीला परतले. अशी मान्यता आहे की ही परंपरा बाराव्या शतकात सुरू झाली.
-
पहिला रथ भगवान बलरामांचा, मधला रथ बहीण सुभद्राचा आणि मागील रथ भगवान जगन्नाथाचा आहे.
-
दरम्यान, असे म्हटले जाते की जगन्नाथ धाममध्ये एक दिवसही एक विशिष्ट काम झाले नाही तर मंदिर आपोआपच १८ वर्षे बंद होईल.
-
जगन्नाथ मंदिराचा ध्वज दररोज बदलला जातो. दररोज सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी मंदिरावरील ध्वज बदलून नवीन ध्वज लावला जातो. (ANI)
-
मंदिराची ही परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. मंदिराच्या घुमटावरील ध्वज बदलण्याचे काम मंदिर सेवक करत आहेत. हा ध्वज नेहमी समुद्रातून वाहणाऱ्या वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकतो. (ANI)
-
पौराणिक मान्यतेनुसार जगन्नाथ पुरीत बसवलेला २० फूट त्रिकोणी ध्वज एका दिवसासाठीही बदलला नाही तर १८ वर्षे मंदिर आपोआप बंद होईल. (ANI)
-
जगन्नाथ धामचा ध्वज बदलण्याची जबाबदारी चोल कुटुंबाकडे असून ते ८०० वर्षांपासून ही परंपरा पाळत आहेत. (ANI)
-
सेवक ध्वज घेऊन साखळ्यांच्या साहाय्याने मंदिराच्या घुमटावर चढतो. त्याआधी तो खाली अग्नी प्रज्वलित करतो. मग हळूहळू तो मंदिराच्या शेवटच्या घुमटापर्यंत पोहोचतो. (पीटीआय)
-
वादळ किंवा पाऊस असला तरीही मंदिराच्या घुमटावरील ध्वज बदलण्याचा हा धार्मिक विधी रोज संध्याकाळी केला जातो. (ANI)
Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश