-
हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. धार्मिक मान्यतांनुसार, श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भगवान शंकराचा जलाभिषेक केल्यास जीवनातील सर्व प्रकारच्या समस्या आणि रोगांपासून मुक्ती मिळते. (इंडियन एक्सप्रेस)
-
यंदा श्रावण महिना हा ऑगस्ट महिन्यात सुरु होईल. पंचांगानुसार ५ ऑगस्ट २०२४ला श्रावण मासारंभ होईल. तर ३ सप्टेंबर २०२४ ला श्रावणी अमावस्येने हा महिना संपेल. (इंडियन एक्सप्रेस)
-
श्रावणात महादेवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. मात्र महादेवाची पूजा करताना काही गोष्टी टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या गोष्टी कोणत्या आहेत ते जाणून घ्या.
-
असे मानले जाते की श्रावणमध्ये भगवान शंकराची पूजा करताना शिवलिंगावर चुकूनही सिंदूर किंवा कुंकू अर्पण करू नये. (इंडियन एक्सप्रेस)
-
हळदीला लक्ष्मीचे रूप मानले जाते. अशा स्थितीत महादेवाला हळद अर्पण करू नये असे मानले जाते. (इंडियन एक्सप्रेस)
-
श्रावण महिन्यात पूजा करताना तुळशीची पाने देखील भगवान शंकराला अर्पण करू नयेत. (इंडियन एक्सप्रेस)
-
धार्मिक मान्यतेनुसार महादेवाला नारळही अर्पण करू नये. नारळ हे लक्ष्मीचे रूप मानले जाते. (इंडियन एक्सप्रेस)
-
धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यात केतकीचे फूल भगवान शंकराला अर्पण करू नये. तसेच कमळाचे फूल अर्पण करू नये. (इंडियन एक्सप्रेस)
-
तसेच श्रावण महिन्यात पितळेच्या भांड्यांमध्ये अन्न खाऊ नये असे मानले जाते. तसेच वांगी खाऊ नयेत. ते अपवित्र मानले जाते. याशिवाय श्रावण महिन्यात दिवसाही झोपू नये. (इंडियन एक्सप्रेस)
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य महितीवर आधारित आहे. (इंडियन एक्सप्रेस)

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी