-
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी त्यांच्या लग्नात कोणतीही कसर सोडली नाही. पालकांनी आपल्या मुलांसाठी पार पाडायच्या सर्व जबाबदाऱ्या ते पूर्ण करत आहेत. (ANI)
-
पण अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाआधी अंबानी कुटुंबाने भारतात पूर्वापार चालत आलेल्या अनेक परंपरा मोडल्या आहे. (इंडियन एक्सप्रेस)
-
अशा परिस्थितीत अंबानी कुटुंब समाजात काही बदल घडवून आणू शकतील की नाही, हे जाणून घेऊया. (पीटीआय)
-
आजवर आपण पाहत आलो आहोत की लग्नाशी संबंधित जवळपास सर्व तयारी आणि विधी मुलीच्या कुटुंबावर लादल्या जातात. (पीटीआय)
-
मात्र ही परंपरा मोडीत काढत अंबानी कुटुंबाने गृहशांती पूजा वगळता आतापर्यंत झालेल्या सर्व सोहळ्यांची व्यवस्था स्वतः केली आहे. (@ viralbhayani /Insta)
-
जेव्हा मुलाची वरात मुलीच्या घरी येते तेव्हा मुलीचे कुटुंबीय त्यांच्या स्वागतापासून इतर सर्व व्यवस्था करताना दिसतात. (पीटीआय)
-
पण अंबानी कुटुंबियांनी मुंबईतील जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये या लग्नाचे आयोजन केले असून त्याचा सर्व खर्च मुकेश अंबानी स्वत: उचलणार आहेत. (पीटीआय)
-
हे अत्यंत प्रशंसनीय गोष्ट असून लग्न लावणे ही एकट्या मुलीच्या कुटुंबाची जबाबदारी नाही हे समाजाला दाखवणारा आरसा आहे.
-
मुलीची पाठवणी झाल्यानंतर वडील मुलाच्या घरच्यांना सांगतात की, आम्ही तुम्हाला सून नाही, तर मुलगी देत आहोत. पण बहुतेक असे दिसून आले आहे की वास्तवात सूनांना मुलींप्रमाणे वागणूक मिळत नाही.
-
अंबानी कुटुंबानेही ही परंपरा मोडीत काढली आहे. आत्तापर्यंत राधिका प्रत्येक फंक्शनमध्ये दिसली आहे. लग्न ठरल्यानंतर अंबानी कुटुंबाने आपल्या भावी सुनेला प्रत्येक कामात आणि विधीमध्ये पुढे ठेवले. ही बाब लक्षवेधी असून समाजाने त्यातून धडा घेतला पाहिजे.
-
साधारणपणे लग्नानंतर मुलगा मुलीचे दागिने स्वतःकडे ठेवतो. पण लग्नाआधीच राधिका मर्चंट तिच्या भावी सासू नीता अंबानी आणि नणंद ईशा अंबानी यांचे दागिने घातलेली दिसली.
-
ईशा आणि आकाश अंबानी यांच्या लग्नातही राधिकाने ईशाचा हिऱ्याचा हार घातला होता.
-
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची पत्रिकाही खूप खास आहे. नीट पाहिलं तर त्यात पुरुषांच्या आधी अंबानी कुटुंबातील महिलांची नावे लिहिलेली दिसतील.
-
आत्तापर्यंत आपण पाहिलं आहे की लग्नपत्रिकेत पुरुषांची नावे असतात आणि महिलांची नावे नंतर येतात, पण कदाचित ही पहिलीच वेळ असेल, ज्यात घरातील महिलांची नावे पुरुषांच्या आधी घेण्यात आली आहेत. (एएनआय/ट्विटर)
-
अंबानी कुटुंबाने केलेल्या या गोष्टी पुराणमतवादी आणि पुरुषप्रधान विचार असलेल्या समाजाला आरसा दाखवतात. कदाचित ही एक नवी सुरुवात आहे जी येणाऱ्या काळात अनेक बदल घडवून आणेल आणि सून आणि मुली असा भेद करणाऱ्यांची विचारसरणी बदलेल.

रीलसाठी थेट रेल्वे रुळावर झोपली! तेवढ्यात भरधाव वेगात ट्रेन आली अन्…, VIDEO पाहून बसेल धक्का