-
भारतातील सर्वात श्रीमंत उद्योजक आणि रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे.
-
शुक्रवारी, १२ जुलै रोजी मुंबईतील बीकेसीमधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये हा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. तर १३ जुलै रोजी शुभाशीर्वाद देण्याचा कार्यक्रम पार पडणार आहे, यानंतर १४ जुलैला रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे.
-
या लग्नसोहळ्यासाठी देशासह जगभरातील उद्योगपती, व्यावसायिक, सेलिब्रिटी आणि राजकारणी उपस्थित राहणार आहेत. मात्र, त्यांच्या लग्नसोहळ्याआधीच मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्स बुकिंग फुल झाले आहेत. तसेच हॉटेल्समधील खोल्यांच्या भाड्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
-
यावर हॉटेल बुकिंग वेबसाईट कंपन्यांच्या मते, मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मधील अनेक पंचतारांकित हॉटेल्समधील रुम्सचे भाडे अनेक पटीने वाढले आहे. यात १४ जुलै रोजी या भागातील हॉटेल्सचे एका रात्रीचे भाडे ९१,३५० रुपये, जे नेहमी १३,००० रुपये प्रति रात्र असे असते.
-
हॉटेल बुकिंग वेबसाईट कंपन्यांच्या मते, ९ जुलै रोजी वांद्र्यातील ट्रायडंट बीकेसी हॉटेलमधील एका रूमचे भाडे प्रति रात्र १५,००० रुपये प्लस टॅक्स, पण १५ जुलैला हेच भाडं १९,७५० रुपये प्लस टॅक्स यानंतर १६ जुलैला ११,७५० रुपये प्लस टॅक्स असे आहे.
-
यात १० जुलैपासून कोणत्याही रुम्स उपलब्ध नाहीत. या हॉटेल वेबसाइटवर १० ते १४ जुलैपर्यंत कोणतीही तारीख निवडली तरी तिथल्या ‘रुम्स सोल्ड आऊट’ असे लिहून येत असल्याचे सांगितले जाते.
-
Sofitel BKC मधील रूमचे भाडं ९ जुलै रोजी १५००० रुपये प्लस टॅक्स, १२ जुलै रोजी ३०,१५० रुपये, १३ जुलै रोजी ४०,५९० रुपये आणि १४ जुलै रोजी ९१,३५० रुपये आहे. यानंतर १५ जुलैनंतर हेच भाडं १६,५६० रुपयांपासून १३,६८० रुपयांपर्यंत आहे.
-
१० व ११ जुलैपर्यंत येथील अनेक पंचतारांकित हॉटेल्सच्या वेबसाइटवर ‘रुम्स सोल्ड आऊट’ असे लिहिलेले दिसून येतेय. पण, इतर पंचतारांकित हॉटेल्स, जसे की ग्रँड हयात, ताज सांताक्रूझ, ताज वांद्रे आणि सेंट रेजिसमध्ये या तारखांना रुम्स उपलब्ध आहेत.
-
बीकेसीमध्ये अनेक कर्मचारी काम करतात. कारण या परिसरात बँक ऑफ बडोदा, इंडियन ऑइल, गोदरेज बीकेसी, स्टेट बँक ऑफ इंडिया, डायमंड बोर्स, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज आणि वीवर्कसारख्या अनेक कंपन्यांची कार्यालये आहेत.
-
बीकेसी हे अनेक राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कार्यालयांचे हब आहे. पण, या हाय प्रोफाईल लग्नामुळे मुंबई वाहतूक पोलिसांनी बीकेसीसाठी ट्रॅव्हल ॲडव्हायजरी जारी केली आहे.
-
जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरकडे जाणाऱ्या रस्त्यांवर १२ ते १५ जुलैदरम्यान दुपारी १ ते मध्यरात्री प्रवेश प्रतिबंधित असेल. ५ जुलै रोजी आलेल्या अधिसूचनेमध्ये सार्वजनिक वाहतुकीची गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक इतर भागातून वळवण्याचे संकेत दिले आहेत. (Photo Credit – freepik, twitter)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”