-
आशियातले सर्वात श्रीमंत व्यावसायिक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आज राधिका मर्चंटबरोबर (Radhika Merchant) लग्नगाठ बांधणार आहे.
-
या भव्य लग्नसोहळ्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती.
-
अनंत व राधिकाचा लग्नसोहळा बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये (BKC Jio World Convention Centre) पारंपरिक हिंदू पद्धतीने पार पडणार आहे.
-
अनंत व राधिकाच्या लग्नानिमित्त संपूर्ण अँटिलियावर (Antilia) रोषणाई करण्यात आली आहे. (Express Photo By Sankhadeep Banerjee)
-
सध्या सोशल मीडियावर अनंत अंबानीची बहीण ईशा अंबानी पिरामलची (Isha Ambani Piramal) चर्चा सुरू आहे.
-
अनंत व राधिकाच्या लग्नानिमित्त ईशाने सुंदर लूक केला होता.
-
या फोटोंमध्ये ईशाने हिरव्या आणि सोनेरी रंगाचा भरजरी लेहेंगा परिधान केला आहे.
-
लेहेंग्यातील लूकवर ईशाने पारंपरिक (Tamilian Jadai Hairstyle) अशी हेअरस्टाईल केली आहे.
-
ईशाच्या या पारंपरिक हेअरस्टाईलने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
-
देश-विदेशातून अनेक सेलिब्रिटी अनंत व राधिकाच्या लग्नासाठी मुंबईत दाखल झाले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : Ambani Update/इन्स्टाग्राम)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख