-
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्याची पूर्ण तयारी केली आहे. १२ जुलै रोजी म्हणजेच आज अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लग्नबंधनात अडकणार आहेत.
-
अनंत-राधिकाचे लग्न पारंपारिक हिंदू वैदिक पद्धतीने होणार आहे. हा तीन दिवसीय विवाह सोहळा मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता.
-
नुकतेच त्यांच्या लग्नाचे पूर्ण वेळापत्रकही समोर आले आहे. मीडिया रीपोर्टनुसार अनंत आणि राधिकाच्या लग्नसोहळ्यासाठी आज दुपारी ३ वाजता लग्नाची मिरवणूक जमणार असून पगडी बांधण्याचा सोहळा देखील पार पडणार आहे.
-
यानंतर ७ वाजता मिरवणूक अँटिलिया येथून निघून बीकेसीमध्ये पोहोचेल. रात्री ८ वाजता वरमाळा सोहळा सुरू होईल, ज्यामध्ये वधू-वर एकमेकांना हार घालतील.
-
संपूर्ण लग्न, सात फेरे आणि सिंदूर दान या सोहळ्याची वेळ रात्री ९:३० वाजल्यापासून सुरू होईल. हा एक महत्त्वाचा आणि धार्मिक विधी आहे, ज्यामध्ये वधू आणि वर साक्षीदार म्हणून एकमेकांना आयुष्यभराचे वचन देतात. या लग्नाच्या कार्यक्रमाला पाहुण्यांना पारंपारिक ड्रेस कोडमध्ये उपस्थित राहावे लागेल.
-
१३ जुलै रोजी एक आशीर्वाद समारंभ देखील आहे, ज्यामध्ये पाहुण्यांसाठी भारतीय पारंपरिक ड्रेस कोड निश्चित करण्यात आला आहे. यानंतर १४ जुलै रोजी ‘मंगल उत्सव’ किंवा लग्नाच्या रिसेप्शन आयोजित करण्यात आला आहे.
-
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला उपस्थित असलेल्या पाहुण्यांच्या यादीत बॉलिवूड, राजकारण, उद्योग, क्रीडा आणि आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींचा समावेश आहे.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”